पत्रकार संजय तिपाले यांना धार्मिक लिखाणाबद्दल तर मावलाई  राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

0
730
Google search engine
Google search engine

पत्रकार संजय तिपाले यांना धार्मिक लिखाणाबद्दल तर मावलाई  राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

धार्मिक लिखाणाबद्दल पत्रकार संजय तिपाले यांना तर उद्योजक शाहिनाथ परभणे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

बीड: नितीन एस ढाकणे

पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो. समाजातील वास्तव स्थितीवर नेमकेपणाने तटस्थ राहून भाष्य करता आलेच पाहिजे यासाठी पत्रकारांना भुतकाळातील नव्हे परंतू वर्तमानातील सर्व क्षेत्राचा व्यासंग हवा यासाठी पत्रकारांनी सातत्याने चिंतनशील होणे गरजेचे आहे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांनी केले..

बर्‍हाणपुर (ता.गेवराई) येथील मावलाई युवक क्रिडा मंडळ व व्यायामशाळेच्यावतीने मावलाई देवी यात्रेनिमित्त दिल्या जाणार्‍या मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. 1 एप्रिल रोजी बर्‍हाणपुर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जगदिश पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार महेश वाघमारे, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे ऍड.अजित देशमुख, दिव्यमराठीचे जिल्हाप्रतिनिधी दिनेश लिंबेकर, संस्थेचे अध्यक्ष विष्णू यादव, सचिव भागवत वराट, सुशील देशमुख, बालाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संजय तिपाले यांना धार्मिक लिखाणाबद्दल तर उद्योजक शाहिनाथ परभणे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होतेे. प्रास्ताविक भागवत वराट यांनी केले.

पत्रकार महेश वाघमारे म्हणाले, समाजातील घडणार्‍या प्रत्येक घटनांचे प्रतिबिंब वृत्तपत्रातून उमटत असते. हे काम म्हणूनच आव्हानात्मक असते, अशा क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येक तरूण पत्रकारांनी अभ्यासू बातमीदारी करणे गरजेचे आहे. हे सारे करत असतांना वर्तमानातील सर्व क्षेत्राचा व्यासंग असायला हवा. यातूनच पत्रकारिता फुलत, बहरत जात असते. बीड जिल्ह्याला पत्रकारितेचा समृद्ध वारसा आहे. जिल्ह्यातील आजचे तरूण पत्रकार समाजातील विधायक उपक्रमांना चांगल्या पद्धतीने वृत्तपत्रातून स्थान देते याचा अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.

याप्रसंगी ऍड.अजित देशमुख, दिनेश लिंबेकर, सुशील देशमुख यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देतांना पत्रकार संजय तिपाले व शाहिनाथ परभणे या पुरस्काराने आणखी बळ मिळाले असल्याचे नमुद करत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानंतर सकारात्मक कार्य करण्याची उर्जा मिळत असल्याचे सांगत यापुढेही जबाबदारीने कार्य करत राहू अशी प्रांजळ भावना व्यक्त केली. श्रीराम वराट यांनी उपस्थितांचे आभार मानले.