हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हेच हिंदूंचे धर्माप्रती कर्तव्य आहे ! – रश्मी परमेश्‍वरन्, हिंदु जनजागृती समिती

0
939
Google search engine
Google search engine

पंडालम्, पठणमथिट्टा (केरळ) – धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हेच धर्माप्रती आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी केले. येथील श्री कडयक्कड भद्रकाली मंदिरात नुकतेच हिंदु धर्म संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात ‘धर्माचरण आणि हिंदु संस्कृती’ या विषयावर त्या बोलत होत्या.

‘हिंदु हेल्पलाईन’चे समन्वयक श्री. प्रदीश विश्‍वनाथ यांच्या हस्ते संमेलनाचे  उद्घाटन करण्यात आले. कु. परमेश्‍वरन् पुढे म्हणाल्या, ‘‘हिंदु संस्कृती ही अतिशय प्राचीन आणि सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. माया, इझका, यझिदी आणि इंडोनेशिया येथील संस्कृती मधील सर्व पद्धती सनातन धर्माशी मिळत्याजुळत्या आहेत. हिंदु संस्कृती आधुनिक विज्ञानापेक्षाही अतिशय प्रगत होती; परंतु निधर्मीवाद, धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळे भारतातच ही संस्कृती धोक्यात आली आहे. धर्मावर आधारित हिंदु राष्ट्राची पुनर्स्थापना करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण सर्वांनी धर्माचरण करणे आणि साधना करणे आवश्यक आहे.’’ या संमेलनाला १०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.