फरार सागर गाढवेला अखेर अटक – १५ दिवसांपासुन होता फरार >< चांदूर रेल्वे येथील बहुचर्चीत हत्या प्रकरण

0
796
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वेः – (शहेजाद खान )
पैशाच्या वादावरून १४ मार्च रोजी चांदूर रेल्वेत झालेल्या गंभीर मारहाणीत एकाचा मृत्यू झाला होता. शहरातील या बहुचर्चित हत्या प्रकरणातील फरार आरोपी सागर गाढवेसह इतर दोघांना अटक केली असुन या प्रकरणामध्ये अजुनही २ आरोपी फरार आहे.
मोर्शी तालुक्यातील शिरजगाव येथील पंडित विक्रम पाटणकर (४५) व अमरावती येथील लक्ष्मीनगरमध्ये राहणारे गौरव सुरेश तिडके (२७) या दोघांना आरोपी शुभम सिताराम दुबे व त्याच्या साथिदारांनी १४ मार्च रोजी चांदूर रेल्वेत बेदम मारहाण करून त्यांना अमरावतीला सोडुन पळ काढला होता. १५ हजार रूपयावरून झालेल्या या वादात उपचारादरम्यान पंडित पाटणकर यांचा मृत्यु झाला. तक्रार आल्यानंतर या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीसांनी २० मार्चला गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणातील फरार आरोपी सागर पांडुरंग गाढवे (३०) व मनिष रतनलाल उपाध्याय (३०) रा. चांदूर रेल्वे यांना मंगळवारी पोलीसांनी अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना आज (६ एप्रिल) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याच प्रकरणातील राहुल तांडेकर रा. चांदूरवाडी याला गुरूवारी सायंकाळी अटक केली. राहुल तांडेकर याला आज (६ एप्रिल) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
यापुर्वी चांदूर रेल्वे पोलीसांनी शुभम सिताराम दुबे (२४) सह पवन सुरेशसिंह ठाकुर ( ३२), चेतन भांकरलाल रॉय(२७), राजा विष्णुपंत राऊत (२४) विजय उपाध्याय (वय ४०) रा.चांदूर रेल्वे व विजय तिवारी (वय ३०) रा. अकोला यांना अटक केली असुन या सहा ही आरोपींना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात एकुण आरोपींची संख्या ११ असुन आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजुनही वैभव संजय पांडे व रितेश बनारसे हे दोन आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय भारत लसंते करीत आहे.
इतर आरोपींच काय?
सदर प्रकरणात सुरूवातील ११ आरोपींसह इतर आरोपी असे दाखविण्यात आले होते. तसेच या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तविल्या जात होती. परंतु ११ व्यतिरिक्त इतर एकाही आरोपीचे नाव अजुन पुढे आलेले नाही. त्यामुळे पीएसआय भारत लसंते या प्रकरणाची कसुन चौकशी करून ११ व्यतिरिक्त इतर आरोपींना अटक करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.