झेंडीगेट कत्तलखाणा प्रकरण – तीन पोलीस कर्मचारी निलंबित ! संबंधित सेक्शन अधिकारी, हवालदारवर कारवाई होणार का ?

0
1161

उमेर सय्यद / नगर :-

अहमदनगर शहराच्या झेंडीगेट परिसरात माहावीर जयंतीच्या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने अवैद्द कत्तलखाण्यावर कारवाई केली होती , कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असेलेले झेंडीगेट मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या वतिने कारवाई करण्यात आल्याने कोतवाली पोलीस ठाण्यातील संबंधित सेकशन अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होने संभव होते व कारवाई झाली देखील पण ती कारवाई फक्त कर्मचाऱ्यावर झाल्याने संबंधित सेक्शनच्या अधिकारी किंवा हवालदार यांच्यावर कारवाई होइल का ?

या प्रकरणात कोतवाली पोलिस ठाण्याचे ३ पोलीस कर्मचारी निलंबित झाले आहे झालेल्या निलंबित कर्मचारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला आहे ,

मात्र निलंबित कर्मचाऱ्यांनि केलेल्या या भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्याना माहिती नव्हती का ? जर माहिती होती तर कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व सेक्शन अधिकारी एवढ्या दिवस गप्प का होते ? जरी संबंधित निलंबित कर्मचाऱ्यांचि भ्रष्टाचाराचि माहिती संबंधित सेक्शन अधिकाऱ्यांना नव्हती , तर झेंडीगेट मध्ये अवैद्द कत्तलखाना चालतो याची माहिती संबंधित सेक्शन अधिकारी वर्गाला नव्हती का ? जर होती तर निलंबनाची कारवाई फक्त कर्मचाऱ्यांवरच का व भ्रष्टाचाराचे आरोप फक्त या कर्मचाऱ्यांवरच का ? या कर्मचाऱ्यांच्या निलंबनासाठी असे कोणते ठोस पुरावे मिळाले ? तसेच या सेक्शनला एक हवालदार आणि एक अधिकार या कर्मचाऱ्यांच्या वर असताना देखील त्यांच्या बाबतीत एकही ठोस पुरावा नाही का ? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे !

मागील माहिन्यात नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे असाच छापा स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाने टाकला होता त्यावेळी मात्र संबंधित अधिकारी यांना देखील पोलिस अधिक्षकानि कारवाईचा बडगा दाखवला होता मात्र आता पोलीस अधीक्षक साहेब या संबंधित पोलीस ठाणे अधिकारी , सेक्शन अधिकारी व सेक्शन हवालदार यांच्यावर देखील आता तरी कारवाई करनार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे ?