जिल्हा काँग्रेसच्या वतीने 9 एप्रिल सोमवार रोजी बीड येथे एक दिवसीय उपोषण

0
892
Google search engine
Google search engine

जिल्हा काँग्रेसच्या वतीने 9 एप्रिल सोमवार रोजी बीड येथे एक दिवसीय उपोषण

एक दिवसीय उपोषणास व बैठकीस काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – राजकिशोर मोदी

बीड: नितीन ढाकणे

:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दि.9 एप्रिल रोजी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. देशातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणून बुजून धोका पोहोंचविण्याचा प्रयत्न सत्तारूड भाजप सरकार कडून होत असताना अशा काळात काँग्रेस पक्षाची जबाबदारी वाढली आहे.देशातमध्ये व राज्यामध्ये सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी संपुर्ण प्रयत्न करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाला करावी लागणार आहे.याचाच एक भाग म्हणून हे एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे.तरी या उपोषणात बीड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.राहुलजी गांधी यांच्या सुचनेवरून संपुर्ण देशभर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सोमवार दि. 9 एप्रिल रोजी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण होत आहे.केंद्रातील व राज्यातील सत्तारूढ भाजप सरकारच्या चुकीच्या व द्वेष पुर्ण भुमीकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाला आहे. राज्यात भिमा कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजात जाणिवपुर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच राज्यातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकाचा आवाज दाबला जात आहे.भारताची वाटचाल लोकशाहीवरून हुकुमशाहीकडे सुरू आहे.एक प्रकारची अघोषीत आणिबाणी भाजपाने देशावर लादली आहे.भाजप सरकारच्या काळात राज्यात 13 हाराहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या असताना या पिडीत शेतकरी कुटुंबाना न्याय देण्याऐवजी भाजप उत्सव साजरा करण्यात दंग आहे. अंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही इंधन महाग आहे.माध्यमावर व पत्रकारांवर बंधने घालुन भाजपाचे मोदी सरकार हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे.वाढती महागाई,कराचा बोजा यामुळे सर्वसामान्यांची लुट होत आहे.“अब की बार महेंगाई की मार” सामान्यांना सहन करावी लागत आहे. त्यामुळे देशातील सामाजिक सलोखा व शांतता कायम ठेवा, इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणा आदी मागण्यांसाठी बीड येथे एक दिवसीय उपोषण होत आहे.
या उपोषणात काँग्रेसचे बीड जिल्हा प्रभारी सत्संग मुंडे,अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य तथा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे,माजी मंञी अशोकराव पाटील,अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे सदस्य रवींद्रजी दळवी,माजी आमदार सिराजभाई देशमुख,माजी आमदार डॉ.नारायणराव मुंडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे,बीड जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, अंबाजोगाई शहराच्या नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,केज नगरपंचायतचे अध्यक्ष आदित्य पाटील यांच्यासहीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आजी-माजी खासदार, आमदार,जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व सेलचे आजी माजी पदाधिकारी,आजी -माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिति सदस्य,पक्षाचे आजी माजी नगरसेवक,आय काँग्रेस,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस,सोशल मिडिया व सर्वच सेल, सरपंच,उपसरपंच यांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.राहुलजी साळवे, महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मिनाक्षीताई पांडुळे पाटील,अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष असेफोद्दीन खतीब, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष राहुलजी टेकाळे,अनुसूचीत जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गोविंदजी साठे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गणेशजी राऊत,ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलजी जाधव, सेवादलचे जिल्हाध्यक्ष शहादेवजी हिंदोळे,सर्व तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष आदींनी केले आहे.
—————————–

*_बीड येथे काँग्रेसची बैठक -बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांची माहिती_*
—————————-
सोमवार,दिनांक 9 एप्रिल रोजी एक दिवसीय उपोषणानंतर दुपारी 4 वाजता बीड येथील शासकिय विश्रामगृहावर बीड जिल्हा काँग्रेस कमेटी पदाधिकारी,नेते व कार्यकर्त्यांची महत्त्वपुर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी मंञी,आजी-माजी खासदार,आमदार, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी,जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व सेलचे आजी माजी पदाधिकारी,आजी -माजी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिति सदस्य,पक्षाचे आजी माजी नगरसेवक,आय काँग्रेस,युवक काँग्रेस, महिला काँग्रेस,सोशल मिडिया व सर्वच सेलच्या पदाधिका-यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

▪▪▪
===============