काटसुर अपघातग्रस्तांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ताभाऊ ढोमने यांनी घेतली भेट

0
893
Google search engine
Google search engine

अमरावती

यावली चौफुली येथे आज शनिवारी दुपारी 12 वाजता दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि चारशे सात यांचा मोठा अपघात घडला सदर अपघातमध्ये काटसुल येथील 13 नागरिक गंभीर जखमी झाले.शनिवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमने यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून जखमिंची माहिती घेतली.
शनिवारी यावली मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस चा व चारशे सात यांच्या मध्ये मोठा अपघात झाला सदर अपघाता मध्ये 13 नागरिक गंभीर जखमी झाले अपघाता मध्ये जखमी झालेले उपाध्यक्ष दत्ता ढोमाने यांच्या सर्कल मध्ये येणार्या काटसुल चे असल्याने ढोमने यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये जावून अपघात ग्रस्तांची माहिती घेतली व जखमींना योग्य उपचार देण्यासंदर्भात त्यांनी येथील वैद्यकीय अधिकार्यांना सुचना दिल्या.