परळीतील संभाजीनगर पोलिसांची दबंग कारवाई

0
794

परळीतील संभाजीनगर पोलिसांची दबंग कारवाई:

चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश:

बीड :नितीन ढाकणे

:चोरट्यांनी परळी येथील गटसाधन केंद्र फोडून आतील संगणक आदी मुद्देमालाची चोरी केली होती. चोरीचा छडा लावण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे अन्य एक फरार आहे. पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमालही यावेळी जप्त केला आहे.

अधिक माहित अशी कि, दि. ३० मार्च रोजी रात्री १० वाजता शिक्षकांच्या ऑनलाईन बदली बाबत माहीती भरुन कर्मचाऱ्यांनी गटसाधन केंद्र बंद करून निघून गेले. त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टया झाल्या. दि. २ एप्रिल रोजी कार्यालय पुन्हा उघडले असता आतील तीन संगणक चोरीला गेल्याचे आढळून आले.
यामध्ये एकूण 1लाख 25 हजारांच्या मालाची चोरी झाली होती, याची तक्रार संभाजीनगर पोलिसात देण्यात आली. संभाजीनगर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे परळी शहरातील भीमवाडी भागातील धनराज संजय वाहुळे यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने अन्य एकासोबत मिळून चोरी केल्याचे कबुल केले. चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर आरोपीस न्यायालयाने १९ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या चोरीतील अन्य एक आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. हि कारवाई अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या विशेष पथकाने आणि संभाजीनगर पोलीस अंमलदार रमेश सिरसाट यांनी पार पाडली.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या सोबत भास्कर केंद्रे, सचिन सानप,संग्राम सांगवे ,माधव तोटेवाड यांनी यशस्वी योगदान दिले.
संभाजीनगर पोलिसांच्या कारवाई बद्दल व पोलिसांबद्दल परळीतील जनतेत विश्वास अधिक प्रबळ झाला आहे.