*शेतकऱ्याच्या सेंद्रिय भाजीपाला थेट विक्री पिक अप पाँइंटला आकोटात जोरदार प्रतिसाद*

0
943
Google search engine
Google search engine

आकोट / संतोष विणके –

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अंतर्गत शहरवासींयाकरीता सेंद्रिय भाजीपाला खरेदीची सुविधा सोनु चौक येथे उपलब्ध करण्यात आली आहे.सेंद्रिय भाजीपाला विक्रीच्या या प्रयोगाला पहील्याच दिवशी शहर वासीयांचा जोरदार प्रतीसाद मिळाला.चितलवाडी येथील युवा शेतकरी राजीव वाघ या पठ्ठ्याने लोकांना उत्तम आरोग्यासाठी ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे.विशेष म्हणजे त्याने या विक्री सुविधेचे सुक्ष्म नियोजन केले असुन नियमित खरेदीसाठी नोंदणी देखील केली आहे.याद्वारे नोंदणीकृत खरेदी दारांना क्रमांक देऊन त्या क्रमांकाची भाजीपाला असलेली पिशवी ही सेवेत तयार ठेवली जाते.त्याच्या या अभिनव प्रयोगाला भन्नाट यश मिळत असुन पहील्याच दिवशी ८० पेक्षा जास्त लोकांनी नियमीत सेंद्रिय भाजीपाला खरेदीसाठी पसंती दर्षवत भाजीपाला खरेदीचा आनंद घेतला.यावेळी सेंद्रिय भाजीपाला खरेदीसाठी शिरिष वंजारा,मुरलीधर इंगळे,अरुण सांगळुदकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित ग्राहकांची उपस्थीती होती.आज पहील्याच दिवशी १५ रु.किलो.या अल्प दरात सेंद्रिय वांगी,घोळ,कांदा,कारली विक्रिसाठी ठेवताच हातोहात संपली.ग्राहकांच्या या जोरदार प्रतीसादामुळं आणखीन सेंद्रिय भेंडी ,टोमॅटो,दोडके,ढेमसी व ईतर भाजीपाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.या सेंद्रिय भाजीपाला खरेदीसाठी राजीव वाघ-८८८८449947, नेमिश सेजपाल-९८५०२८६७२६, संतोष विणके- ९८५०३३६७०६ यांना संपर्क करता येईल.सेंद्रिय भाजीपाला विक्रीचा हा पिक अप पॉइंट दर रवीवारी आकोटातील सोनु चौक येथे स.११वाजे पर्यत असणार आहे.प्रचलीत बाजार व्यवस्थेला झुगारत दर्जेदार भाजीपाला उपलब्ध करुन देणारा हा प्रयोग ग्राहकांच्या पसंतीने प्रचंड हीट ठरला आहे.