चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का

0
688
Google search engine
Google search engine

आयपीएलमध्ये दोन वर्षांनंतर दिमाखदार पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. या हंगामातील मुंबई इंडियन्सविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात केदार जाधवला दुखापत झाली होती. दुखापतीनंतरही केदार जाधवने दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली होती. परंतु झालेल्या दुखापतीमुळे केदारला स्पर्धेतून बाहेर जावे लागणार आहे. चेन्नईने केदारला ७ कोटी ८० लाखांना खरेदी केले होते. आता केदारच्या जागी कोणत्या खेळाडूची वर्णी लागणार हे अद्याप कळू शकलेले नाही.