*शीतल झाडे यांना सोशल मिडिया महामित्र पुरस्कार*

0
871

नागपूर / सचिन बडे –

महाराष्ट्र सरकारच्या वतीने सोशल मिडिया महामित्र पुरस्कारासाठी नागपूर उमरेड विधान सभा मतदार संघातून शीतल अशोक झाडे यांची निवड झाली.

सोशल मिडिया या उपक्रमाचा पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह , मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र्जी फडणवीस यांच्या हस्ते व सिने अभिनेते श्री. मकरंद अनासपुरे, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच श्री. पोपटराव पवार,पत्रकार श्री. डॉ. उदय निरगुडकर , पद्मश्री श्री.मिलिंद कांबळे , सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर , स्पृहा जोशी , श्री. प्रदीप लोखंडे , श्री. दीपक घैसास, संपादक श्री. दिनकर रायकर,संपादक श्री. अशोक पानवलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालया कडून समाज माध्यमामध्ये विधायक काम करणाऱ्यासाठी सोशल मिडिया महामित्र ही संकल्पना सुरु केली असून, पहिल्यांदाच हा उपक्रम राबवण्यात आला. विधानसभा मतदारसंघ निहाय एका व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या दिलेल्या प्रतिक्रियेत झाडे यांनी, सोशल मिडिया महामित्र या नात्याने माझी निवड झालेल्या भागामध्येचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणी लोकाकडून ८०% समाजकारण आणि २०% राजकारणाला पूरक गोष्टी करवून घेवून सोशल मिडिया मार्फत विधायक संदेश आणि विवेकी समाज बनवण्याचा उद्देश बोलून दाखवला .

आणि जनकल्याण करण्यासाठी आणि सोशल मीडियावर होणाऱ्या हालचालीवर सदैव लक्ष असणार आहे असे शीतल यांनी सांगितले