*स्व.प्रबोधनकार ठाकरे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब यांना*

0
725
Google search engine
Google search engine

अकोला:-

महाराष्ट्र संपादक परिषद पुणे यांचा स्व.प्रबोधनकार ठाकरे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब यांना जाहीर झाला असून 15 एप्रिल रोजी सायं 5 वा यशदा , बाणेर रोड पुणे येथे आयोजित समारंभात भारताच्या माजी राष्ट्रपती मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभ हस्ते पत्रकार मिरसाहेब यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाणार आहे
दैनिक पुढारी चे संपादक पद्मश्री डा बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या समारंभात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.ना.गिरीष बापट हे मान्यवर अतिथी म्हणून व महाराष्ट्र सहकारी पत संस्था फेडरेशन चे अध्यक्ष क्रेडिट न्यूज चे संपादक काकासाहेब कोयटे , महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे , अतिथी म्हणून समारंभात उपस्थित राहणार आहेत
ज्येष्ठ पत्रकार मिरसाहेब मागील 42 वर्षांपासून अकोला जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून मराठी , हिंदी , इंग्रजी या तिन्ही भाषेत त्यांनी पत्रकारिता केलेली आहे , मराठी पत्रकार परिषद मुंबई चा राज्यस्तरीय पा वा गाडगीळ उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार – 2013 , शासनाचा सामाजिक सद्भावना पुरस्कार , डा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती जीवन गौरव पुरस्कार – 2017 , आदी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत , मिरसाहेब , अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष असून शासनाच्या प्रेस एकरिडीएशन कमिटी चे सदस्य आहेत , कृषी ,सहकार,शिक्षण,उद्योग ,सामाजिक ,राजकीय विविध विषयांवर त्यांनी भरपूर लिखाण केलेले आहे , पत्रकारितेच्या विषयावर ” माझे अग्रलेख 1980 ते 2016 ” यावर 3 पुस्तके त्यांनी लिहिली असून ती सार्वजनिक वाचनालयाला दान केली आहेत , कृषी , सहकारी , सामाजिक विविध संघटनांचे ते पदाधिकारी असून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रीयतेने कार्यरत आहेत ज्येष्ठ पत्रकार मिरसाहेब यांना महाराष्ट्र संपादक परिषद पुणे चा स्व.प्रबोधनकार ठाकरे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख , परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा , अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजूरकर , संजय खांडेकर व सर्व पदाधिकारी व पत्रकारांनी मिरसाहेब यांचे अभिनंदन केले आहे