एसटी महामंडळाची दररोज जमा होणारी रोख रक्कम आता स्थानिक राष्ट्रीयकृत बँक स्वतः आगारात येऊन घेऊन जाणार

0
821
Google search engine
Google search engine

एसटी महामंडळाची दररोज जमा होणारी रोख रक्कम आता स्थानिक राष्ट्रीयकृत बँक स्वतः आगारात येऊन घेऊन जाणार

प्रतिनिधी- दिपक गित्ते व नितीन ढाकणे

एसटी महामंडळाची तिकीट विक्रीतून दररोज जमा होणारी रोख रक्कम आता स्थानिक पातळीवरील राष्ट्रीयकृत बँक स्वतः आगारात येऊन घेऊन जाणार. या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या दरवर्षी रोकड हाताळणीसाठी खर्च होणाऱ्या सुमारे १३ कोटी रुपयांची होणार बचत- परिवहनमंत्री D Raote यांचा निर्णय.

काही महिन्यांपूर्वी सोलापूर आगारात १५ लाख रुपयांची रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी घेऊन जात असताना चोरट्यांनी ही रक्कम चोरली होती, या घटनेची मंत्री DRaote यांनी घेतली गंभीर दखल आणि रोख रक्कम भरण्याची जबाबदारी संबंधित बँकेवर सोपविण्याच्या एसटी प्रशासनाला केली सूचना.