१५ एप्रिलपासुन चांदूर रेल्वेत क्रिकेट उन्हाळी शिबीर – संत गजानन क्रिकेट अॅकॅडमीचे आयोजन

0
658
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे- (शहेजाद खान ) 
     उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या  कलागुणांना, क्रीडाकौशल्याला वाव देण्यासाठी सुवर्णसंधी. अभ्यासापासून मिळालेले स्वातंत्र्य, वेळेचा सदुपयोग करण्याची भावना, नवीन काही शिकण्याची ईच्छा या सर्व नानाविध गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी करुन घेण्यासाठी शहरातील संत गजानन क्रिकेट अॅकॅडमी व्दारा प्रथमच उन्हाळी क्रिकेट शिबिर भरविण्यास सुरुवात केली आहे.
       स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणावर १५ एप्रिल ते २५ मे दरम्यान दररोज सकाळी ६.३० ते ९ व सायंकाळी ५ ते ७ यावेळात सदर शिबीर चालणार आहे. या शिबीरामध्ये ७ वर्षावरील मुले, मुलींना सहभागी होता येणार आहे. शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे तज्ञ प्रशिक्षक, खेळाडुंना टर्फ गवताच्या पिचवर खेळविण्यात येणार, गेस्ट प्रशिक्षणाच्या स्वरूपात रणजी संघाचे प्रशिक्षक शिबीरात प्रशिक्षण देईल, राष्ट्रीय व रणजी खेळाडू शिबीरात खेळाडूंना मार्गदर्शन करेल, खेडाळुंना प्रमाणपत्र मेडल व क्रिकेट ड्रेस अॅकॅडमीकडून देण्यात येईल, बाहेरगावच्या खेळाडंसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. खेडाळुंना बी.सी.सी. लेवल बी. कोच संदिप गावंडे व विद्यापीठ संघ प्रशिक्षक डॉ. विनोद कपिले प्रशिक्षण देणार आहे. तरी या शिबीराचा परीसरातील जास्तीत जास्त खेडाळुंनी घ्यावा असे आवाहन अमर मोरे, नंदु सोरगिवकर, आशिष ताथोडे, अमन ठाकुर आदींनी केले आहे.