बारावीचा निकाल वेळेवर लागणार!

0
648

बारावीचा निकाल वेळेवर लागणार!

प्रतिनिधी: दिपक गित्ते व नितीन ढाकणे

शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची सकारात्मक बैठक झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इयत्ता बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 2012 पासून नियुक्त व ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना तातडीने नियुक्ती मान्यता देण्यात येईल. त्याचबरोबर कायम विना अनुदानितची मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांची यादी ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. 17 एप्रिल 2018 रोजी अर्थमंत्र्यांबरोबरच्या संयुक्त बैठकीत 171 वाढीव पदांवरील शिक्षकांच्या वेतनाच्या तरतुदीसाठी व अर्थ खात्याशी संबंधीत इतर मागण्यांसाठी निर्णय घेण्यात येईल.