विकास कामांसाठी प्रयत्नशील : संदीप क्षीरसागर

0
747

शाहूनगरमधील पाईपलाईनच्या कामाचे उद्घाट

बीड : नितीन ढाकणे

बीड : शासनाकडून आलेल्या निधीच्या माध्यमातून दर्जेदार विकास कामे झाली पाहिजेत, मात्र आज पर्यंत असं झालं नाही, नुसती पोपटासारखं बोलून शहराचा विकास होत नसतो. आज बीड शहराचा चेहरा, मोहरा बदललेला पाहिजे होता. गेल्या पंचवीस वर्षात शहरातील जनतेला साध्या मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत, रस्ते, नाल्या, स्वच्छता, शहराच्या विस्तारीत भागात पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. जनतेला मुलभूत सुविधे बरोबरच गेल्या पंचवीस वर्षात पाहिजे ती विकास कामे झाली नसल्याने ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील, अमृत योजनेच्या माध्यमातून शहराच्या विस्तारीत भागाची ताहान भागल्या जाईल, योग्य नियोजन करुन दर्जेदार कामे करुन घेवूत त्यात कसल्याही प्रकारची दिरंगाई चालणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांनी केले आहे. शाहूनगर मधील पांगरी रोड, काशीनाथ नगर, गिराम नगर मधील पाईपलाईनच्या कामाचे जीवन प्राधिकरणचे अभियंता भांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.