धनंजय मुंडे यांनी गण्या आणि मण्याची एक गोष्ट सांगितली.

0
737
Google search engine
Google search engine

सबका साथ,सबका विकास वा रे सरकारधनंजय मुंडेंचा टोला

बीड : नितीन ढाकणे

          मराठा, धनगर, मुस्लिम समजाला आरक्षण देतो सांगितले दिले नाही. लिंगायत समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा देण्याबाबतची मागणी होती तीही पूर्ण करत नाही. सबका साथ सबका विकास वा रे सरकार ,असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या धोरणावर लगावला. निवडणूक काळात मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु १५ लाख रुपये खात्यात यायची सुतराम शक्यता नाही. उदयोगपती बॅंका लुटुन परदेशात चाललेत हे पहाता १५ लाखाचे कर्ज मोदींच्या कृपेने होणार आहेत असेही धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी गण्या आणि मण्याची एक गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचा मतिथार्थ सगळयांना कळला.त्यामुळे मी कुठल्या पक्षाचे नाव घेणार नाही परंतु कोण गण्या आणि कोण मण्या हे तुम्हीच ओळखा असेही मुंडेनी सांगितले.