उत्सव समिती अध्यक्षांवर गुन्हे दाखल केल्यास आंदोलन करणार – संजय गवळी

0
662
Google search engine
Google search engine

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षांवर गुन्हे दाखल केल्यास आंदोलन करणार – संजय गवळी

बीड:१४ एप्रिल या दिवशी संपूर्ण  जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहत साजरी केली जाते. त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या  भारत देशामध्ये गावपातळीवर तसेच शहरपातळीवर मोठ्या प्रमाणात जयंती उत्साहात साजरी होत असते आणि प्रशासन सुद्धा त्या दिवशी विध्यार्थी दिन म्हणून जयंती साजरी केली जाते.परंतु अलीकडे ध्वनिप्रदूषणच्या नावाखाली जयंती उत्सव कमेटीवर ग्रामीण व शहरीभागात गुन्हे दाखल करून आंबेडकरी तरुणांना नाहक त्रास दिला जातो.त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्ने पोलीस प्रशासन करत आहे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल केल्यास आंदोलन करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघ परळी शहराध्यक्ष संजय गवळी यांनी  दिनांक ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात पुढे असे म्हटले की, १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीवर गुन्हे दाखल झाले तर १५ एप्रिल रोजी धरणे आंदोलन.१६ एप्रिल रोजी रस्ता रोको आंदोलन,१७ एप्रिल रोजी हल्लाबोल मोर्चा.१८ एप्रिल रोजी परळी बंद,१९ एप्रिल रोजी मा.पालकमंत्री यांच्या निवास्थानावर धरणे आंदोलन,२० एप्रिल रोजी मा.पालकमंत्री यांच्या निवास्थानावर हल्लाबोल मोर्चा तसेच जो पर्यंत गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत भारिप बहुजन महासंघ जिल्हाभर लोकशाही मार्गाने आंदोलन करेन.आंदोलनाच्या काळात आंदोलनाला हिंसक वळण व काही हानी झाली तर त्याची सर्वस्वी जवाबदारी पोलीस प्रशासनावर असेल. सदरील निवेदनाच्या प्रती माहितीस्तव राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,जिल्हा पोलीस अधीक्षक बीड,तहसीलदार परळी,पोलीस निरीक्षक परळी,पोलीस निरीक्षक संभाजीनगर परळी यांना देण्यात आले आहे.