बीड चा झेंडा जगात मानाने उंचावला राहुल आवरेला १३ वे सुवर्णपदक

0
720

बीड : नितीन ढाकणे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये राहुल आवारेने कुस्तीत सुवर्णपदक जिंकले आहे. ५७ किलो वजनी गटात त्यानी १५ गुण मिळवत कॅनडाच्या स्टीव्हन तकाहाशीचा पराभव केला. स्टीव्हन तकाशीला ७ गुण मिळाले.
पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानी मल्ल मोहम्मद बिलाल याचा पराभव करत अंतिम फेरीत मुसंडी मारणाऱ्या राहुल आवारेने अंतिम फेरीतही धडाकेबाज खेळ केला. एकतर्फी झालेल्या या लढतीत राहुलने सुरुवातीलाच दोन गुण मिळवत झोकात सुरुवात केली. मात्र ताकाहाशीने सलग चार गुणांची कमाई करत लढतीत पुनरागमन केले. पण राहुलने पुन्हा एकदा सामन्यावर नियंत्रण मिळवताना कॅनेडियन कुस्तीपटूची चहुबाजूंनी कोंडी करत आघाडी मिळवली. राहुलचे पूर्ण वर्चस्व असतानाचा त्याला किरकोळ दुखापत होऊन सुद्धा खूप चांगले कमबॅक करत 15-7 अशा फरकाने दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरले.

राहुलच्या विजयाने पाटोदा शहराचे नाव जागतिक पातळीवर झळकू लागले आहे. पाटोदा शहरात दिवाळी साजरी करण्यात आली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे भारताचे कुस्तीमधील पहिले आणि एकूण १३ वे सुवर्णपदक आहे.