बरड पवनी येथे ‘पानी फाउंडेशन’ चे ग्रामस्थांना प्रशिक्षण – गाव पाणीदार करण्यासाठी तालुक्यातील नागरिक सज्ज

0
1379

प्रशिक्षणाला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो ग्रामस्थांनी घेतले एक दिवसीय प्रशिक्षण

रुपेश वाळके / प्रतिनिधी –

अभिनेता आमिर खान पानी फाउंडेशनचे स्वयंसेवक नरखेड तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन बरड पवनी येथे करण्यात आले होते . या प्रशिक्षणामध्ये स्वयंसेवक नागरिकांना पाण्याचे महत्त्व, पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून करावयाची कामे याबाबत मार्गदर्शन केले गेले व आपले गाव पाणीदार करण्यासाठी कश्या प्रकारची कामे करून आपले गाव पाणीदार करता येईल यावर विशेष मार्गदर्शन करून जलसंधारणासोबतच मन संधारणाचेही काम नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे .

पाणी फाऊंडेशन’ हे नरखेड तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न सोडविण्यासाठी गावागावात लोकांना प्रोत्साहित करून मृद व जलसंधारण, पाणलोट व्यवस्थापनाची शास्रशुद्ध पद्धत, उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि विषयातील विज्ञानात लोकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. त्यातून गाव, तालुका टँकरमुक्त करणे, जलसंधारण कामाची लोकचळवळ, गावाच्या विविध प्रश्नांवर काम करणा-या सेवाभावी संस्था, लोक सहभागातून उभी केली आहे. स्पर्धेच्या काळात जलसंधारण, आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवेगळ्या गावांसाठी ही स्पर्धा असून याची आतापासून नरखेड तालुक्यातील सर्व गावे जोमाने तयारीला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्यक्ष स्पर्धा ही ८ एप्रिल ते २२ मे २०१८ दरम्यान असणार आहे. यात नरखेड तालुक्यातील ६५ गावांनी सहभाग नोंदवला आहे . सिने अभिनेता आमिर खान, किरण राव , सत्यजित भटकळ , डॉ अविनाश पोळ , व पाणी फाउंडेशन टीम यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाबाबत नरखेड तालुक्याला उत्सुकता लागली आहे. या ६५ गावातील प्रशिक्षणार्थ्यांना आयोजित प्रशिक्षणामध्ये पाणी फाउंडेशन ची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहेत.

नरखेड तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पानी फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. नरखेड तालुक्यातील एकून ६६ गावांचा समावेश 2018 च्या वॉटर कप स्पर्धेत करण्यात आला आहे. ही स्पर्धा या वर्षी 8 एप्रिल ते 22 मे या काळात ही स्पर्धा रंगणार असली तरी त्यापूर्वी लोकसहभागातून संबंधित गावांना पाणी अडविणे आणि जिरवण्यासाठी विविध कामे करायची आहेत. ही कामे कशा पद्धतीने करायची आहेत, याबाबत ग्राम पांच्यात बरड पवनी यांनी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करून पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , अतुल तायडे , प्रशिक्षक बबिता गडलिंग , शिवहरी टेके , मारुती चौरे , दयाल भादे , अनिल वाघ , आणि त्यांची टीम यांनी नरखेड तालुक्यातील नागरिकांना ग्रामस्थांना एक दिवसीय प्रशिक्षण देऊन कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले .

वॉटर कप स्पर्धेत गाव पाणीदार करण्यासाठी घेण्यात येणार्‍या कामांमध्ये शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदाना अंतर्गत सीसीटी, नाला खोलीकरण व रुंदीकरणासह शोषखड्डा , नर्सरी ,आगपेटी मुक्त शिवार , माती परीक्षण तसेच, विविध कामांचा समावेश असणार आहे. स्पर्धेसाठी निवड झालेल्या गावांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट काम करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी विविध प्रकारे जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवून आपले गाव पाणीदार करण्यासाठी विशेष प्रयत्न नरखेड तालुक्यातील नागरिक करतांना दिसत आहे .

राज्यभरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पानी फाउंडेशन काम करत आहे. पाणी फाउंडेशनतर्फे करण्यात आलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील अनेक गाव पाणीदार झाले असून नरखेड तालुक्यातील प्रत्येक गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी ही लोकचळवळ नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात उभी होतांना दिसत आहे यावेळी प्रशिक्षणाला बरड पवनी येथील सरपंच सौ नीलिमा उमरकर , जय सोनूले , सचिन धोटे , यांच्यासह युवती व महिला मंडळ यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती .