🏅 पंधरा वर्षाच्या अनिशचा विक्रमी ‘सुवर्ण’वेध

0
871

🏅 पंधरा वर्षाच्या अनिशचा विक्रमी ‘सुवर्ण’वेध

 

प्रतिनिधी: दिपक गित्ते नितीन ढाकणे

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धत भारताची पदकांची लयलूट सुरुच आहे. तेजस्विनी सावंत व अंजुम मुद्गिल यांच्यानंतर आता 15 वर्षीय अनिश भानवालाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.

25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम सामन्यात अनिशने 30 गुणांची कमाई करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारा अनिश हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदला गेला आहे.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 16 सुवर्ण, 8 कांस्य व 11 रौप्य पदकासह एकूण 35 पदके जिंकली असून पदतालिकेत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.