कठुआ बलात्कार; फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मनेका गांधी

0
537

कठुआ बलात्कार; फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मनेका गांधी

प्रतिनिधी: दिपक गित्ते

12 वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

कठुआमधील आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोस्को अॅक्टमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले. सध्या पोस्को अॅक्टमध्ये जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होते. यात बदल करुन मृत्यूदंडाच्या शिक्षेचाही समावेश केला जाईल, असे सांगितले जाते.