*अकोट नगर पालीकेत नगर विकास दिन सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम*

0
801

आकोट/संतोष विनके:-

आकोट नगरपरिषदेच्या विद्यमाने २०एप्रिल रोजी नगर विकास दिन साजरा करण्यात येत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
नगर विकास दिन सप्ताहांतर्गत दि १६ला जनजागर मोहीमेचा तथा प्लॕस्टिक निर्मुलन अभियानाला प्रारंभ होत असून शासनाच्या व नगरपरिषदेच्या विविध जनकल्याणाच्या योजना,कार्यक्रम तथा नागरी सेवा व सुविधांची माहीती नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे
दि १७ला कॕशलेस आर्थिक व्यवहार या विषयावर नगरपरिषद सभागृहात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांकरिता “वाचूया थेंब न् थेंब पाण्याचा”ही काळाची गरज या विषयावर निंबध स्पर्धा घेण्यात येत आहे.याच दिवशी सफाई कामगार आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि १८ला नगरपरिषद कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.
दि १९ला नगरपरिषद विभागनिहाय व्हिजन-२०१८-१९ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ या विषयावर कार्यशाळा
दि.२० ला नगर विकास दिन मुख्य समारोह तथा उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा कार्यगौरव व प्रमाणपत्र वितरण व रात्री ८वा संगित रजनी कार्यक्रम संपन्न होत आहे
या विविध कार्यक्रम नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे,मुख्य अधिकारी गीता ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख सप्ताहाचे यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे .नगरपरिषद पदाधिकारी सभापती नगरसेवक सहभागी होत आहे .नागरिकांनी या सप्ताहातील विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आकोट नगरपरिषद द्वारा करण्यात आले