मोटरसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

0
1396
Google search engine
Google search engine

 

👉🏻4 आरोपी आणि 14 गाड्याची जप्ती तर आणखी वाढू शकते आरोपी आणि गाड्याची संख्या :-पोलीस सूत्र आसेगाव

चांदुर बाजार:-

आसेगाव पोलीस स्टेशन येथे मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.वारंवार तक्रार प्राप्त होत असलण्याने आसेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार याचा शोध घेण्याच ठरविले.

या आधी अमरावती जिल्हाच नव्याने निर्मित ठाणे ब्राम्हणवाडा ठडी या ठिकाणी ठाणेदार अजय आकरे यांनी अश्या प्रकारच्या मोठ्या मोटरसायकल टोळीचा पर्दाफाश केला होता.त्यामुळे आसेगाव मध्ये सुद्धा त्यांनी या टोळी ला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली असून आता पर्यंत एकूण 12 मोटरसायकल आणि 4 आरोपी याना अटक करण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे.

या चोरी केलेल्या मोटरसायकल मधील इंजिन बद्दलबीने मोटारसायकल नंबर बद्दलविणे आणि त्याची विक्री कमी किमती मध्ये करणे असे या टोळीचे काम होते.आसेगाव पोलिसांनी गुप्त महिती च्या आधारे आणि तांत्रिक मदतीच्या साहायाने या चोरी केलेल्या मोटरसायकल खरेदी करणार विठ्ठल मावसकर रा.एनखेडी मध्य प्रदेश त्याच्या राहत्या घरून अटक केली तर महाराष्ट्र परतवाडा येथील सूत्रधार अक्षय धुर्वे,सुशील धुर्वे,शेख समीर शेख सलीम सर्व रा.परतवाडा याना अटक केली आहे.त्यांच्या वर चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या सर्व आरोपी याना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या आरोपी कडून mh27 y 2799 हिरो होंडा,mh27 s6804 कावासाकी,mh31 BZ 1067 बजाज,MH 32 E 6526 हिरो होंडा,MH27 J 9546 हिरो होंडा,MH 27 AX स्पेलन्ड र,MP 48 म 1422 हिरो होंडा आणि दोन मोटरसायकल या विना नंबर च्या आहे जप्त करण्यात आले.

*ठाणेदार आसेगाव अजय आकरे *

आम्ही जवळपास या टोळी च्या मागे 1 महिन्यापासून लागलो होतो. आता पर्यंत मुख्य आरोपी हे सापडत नव्हते त्यामुळे या प्रकरणात प्रोग्रेस दिसत नव्हती मात्र तांत्रिक आणि गुप्त माहिती च्या आधारे खरेदी करणारा आरोपी मिडला.त्या वरून इतराना अटक करणे शक्य झाले.या मधील आरोपी आणि चोरीच्या मोटरसायकल ची संख्या अजून तपास करीत असताना जास्त होऊ शकते.