*अकोट शहरामध्ये भिम जयंतीचा जल्लोष*

0
592

अकोट / संतोष विणके :-

१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित्य अकोट शहरात विविध ठीकाणी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली.दुपारी 3 वा.पासुन शहरातील विविध भागातुन मिरवणुकीला सुरवात झाली.मुख्य मिरवणुकीला मोठे बारगण येथुन संध्याकाळी ५ वा.प्रारंभ झाला. मिरवणुक मुख्य मार्गाने शौकत अली चौक,जयस्तंभ चौक,सोनु चौक मार्गाने फीरत याञा चौकात संपली. मिरवणुक मार्गावर ठीकठीकाणी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोनु चौक येथे मोफत उसळ व पोह्याचे वाटप करण्यात आले.मिरवणुकीत महिला लेझीम पथक व व्यायाम शाळांचाही समावेश होता.निळ व फुलांची उधळण करत जय भिम चा जयघोष सर्वञ ऐकु येत होता.

यावेळी भव्य आतषबाजी व फुलांच्या वर्षावात मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते..मिरवणूकीत शहरातील विविध भागातुन १० ते १२ मंडळांनी सहभाग घेतला होता.यावेळी महसुल विभागाचे उपविभागीय अधीकारी उदयसिंग राजपुत ,तहसीलदार विश्वनाथ घुगे , नायब तहसिलदार राजेश गुरव शहर ठाणेदार गजानन शेळके,नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे यांच्यासह शांतता समीती सदस्य, व पोलीस प्रशासानाच्या सहकार्याने मिरवणुक शांततेत व आंनदात पार पडली.