*१२ तास अभ्यास करुन बाबासाहेबांना विचार पुष्पांजली अर्पण*

0
650

आकोट / संतोष विणके :-

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विश्वभूषण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सवा निमित्य स्थानिक निश्चय अकेडमी, उज्ज्वल नगर, अकोट येथे प्रा. भूषण पर्वतकर यांच्या मार्गदर्शनात 12 तास अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि: 13 एप्रिल 2018ला सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.बाबासाहेबांना विचार पुष्पांजली अर्पण करणाऱ्या या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात ज्योत्स्ना चवरे, दिव्या इंगळे, प्रज्ञा डोंगरदिवे, अश्विनी दांडगे, साहील ढोकणे ,निशा डोंगरे, अजिंक्य ताठे, शिवम् तेलगोटे, प्रांजलि शेगोकार, हीमेश ढोकणे,आकांक्षा तेलगोटे, पायल ओइम्बे, परिमिति मोहोड़, संतोष विणके, सरोजिनी रणित, शारदा पर्वतकर यांनी 12 तास अभ्यास उपक्रमात वाचन करुन आपल्या लाडक्या नेत्यास आदरांजलि वाहिली.