रेवली येथे महामानवाच्या जयंती दिनी श्रमदान

0
1426
Google search engine
Google search engine

महामानवाच्या जयंती दिनी श्रमदान करण्यास तहसिल व  पचांयत समिचीचे अख्खे प्रशासन रेवली  गावात.

बीड: नितीन ढाकणे

परळी: तालुक्यातील रेवली गाव पाणी फाउंडेशनच्या वाँटर कप स्पर्धेत असुन गावातील लोकांचा सहभाग वाढावा म्हणुन परळीचे तहसिल   व पंचायत समितीच्या प्रशासनाने डाँ.बाबासाहेब आंबेडकराच्यां 127व्या जयंती दिनी श्रमदान करून गावातील लोकांमध्ये उस्ताह निर्माण केला.

सत्यमेव जयतेच्या पाणी फाउंडेशन तर्फे परळी तालुक्यात साठ गावे आपले गावं पाणीदार करण्यासाठी अंग झटकुन कामाला लागली असुन पहावे त्या गावात श्रमदानाचे तुफान दिसत असुन शासन,प्रशासन सुध्दा गावातील लोकांनी जास्तीत जास्त या मोहिमेत सहभागी व्हावे म्हणुन श्रमदानात सहभागी होत आहे.तालुक्यातील रेवली गावात डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंती दिनी गावातील लोकांबरोबर तहसिलदार शरद झाडके,पंचायत समितिचे गटविकास अधिकारी संजय केर्दें,विस्तार अधिकारी रोडेवाड,बाभळे,पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, सरपंच मनोहर केदार,जलनायक,वसंत मुंडे,कमलाकर कांदे,माऊली राऊत , सौ.सुलोचना पांचाळ,सौ.उषाबाई कांदे तसेच तलाठी,ग्रामसेवक व सर्व ग्राम पंचायत सदस्य व गावकरी मंडळ यांनी  श्रमदान करून गावातील लोकांमध्ये उस्ताह निर्माण करण्याचे काम केले.