पांगरी वरून परळीला विद्यार्थी घेऊन येत असलेल्या ऑटोला कार ने मागून येऊन उडवले

0
657
Google search engine
Google search engine

पांगरी वरून परळीला विद्यार्थी घेऊन येत असलेल्या ऑटोला कार ने मागून येऊन उडवले

प्रतिनिधी: दिपक गित्ते

सविस्तर वृत्त असे की पांगरी येथील ऑटो आठ विध्यार्थ्यांना घेऊन परीक्षेसाठी परळीला येत असताना टोकवाडी पासून काही अंतरावर असलेले दत्त मंदिर परिसरात येताच ऑटोला क्र(एम. एच. ४४ इ. ९४७३) याला मागून येत असलेल्या कार (एम. एच. १२ इ. ८१६०) ने जोराची धडक दिली.

त्यात ऑटो त्या धडकेत पलटी होऊन रस्त्याच्या खाली जाऊन पडला त्यात ऑटो चालक बाळू रामा राठोड गंभीर जखमी झाले असून त्यातील आठ विद्यार्थ्यांपैकी एकाचा पाय, एकाचा हात मोडला असून बाकीचे सहाजण किरकोळ जखमी झाले असून यात सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

सर्व जखमींना परळी शिवाजी चौक येथील श्रीकृष्ण हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे .