सोशल मिडीयावर डिसप्ले पिक्चर काळे ठेवत कठुआच्या घटनेचा निषेध – चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी साठी युवकांचा असाही सहभाग

0
657
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
  कठुवा आणि उन्नाव या ठिकाणी झालेल्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. देशभरातुन अाराेपींनी फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी जाेर धरत अाहे. साेशल मिडीयावरही या घटनेचा निषेध करण्यात येत असून अनेकांनी अापले व्हाटस्अॅपचे डीपी (डिसप्ले पिक्चर) काळे ठेवत अापला निषेध नाेंदवित अाहेत.
      जम्मू-काश्मिरात आठ वर्षीय चिमुरड्या असिफाची बलात्कारानंतर नराधमांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली अाहे. अमरावती जिल्ह्यासह संपुर्ण देशात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत अाहे. त्याचबराेबर गेल्या तीन ते चार दिवसांपासून इंटरनेट वापरणाऱ्यांनी अापल्या व्हाटस्अॅपचे डीपी (डिसप्ले पिक्चर) काळे ठेवत या घटनेचा निषेध नाेंदविताना दिसत अाहेत. त्याचबराेबर ‘जस्टिस फॉर असिफा’, ‘वूई वॉण्ट जस्टिस’ हा हॅशटॅगही वापरला जात अाहे. फेसबुकवर सुध्दा चिमुकलीच्या न्यायासाठी अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहे.  प्रत्येकाला माेर्चात किंवा अांदाेलनात सहभागी हाेता येत नाही. त्यामुळे काळे डिपी ठेवून का हाेईना या घटनेचा निषेध नाेंदवून चिमुकलीला न्याय मिळवून देणाऱ्यांच्या साेबत अाम्ही सुद्धा अाहाेत हे सांगण्यासाठी असे डिपी युवकांकडुन ठेवण्यात येत अाहेत. असे डिपी ठेवून माेठी क्रांती जरी हाेणार नसली तरी अांदाेलन करणाऱ्यांना सर्वजण त्यांच्या साेबत अाहाेत, हा अाधार त्यांना यातून मिळत अाहे. त्यामुळे काळे डिपी ठेवून या घटनेचा एक प्रकारे निषेध नाेंदविला जात अाहे. त्याचबराेबर विविध पाेस्ट्स मधून भाजपालाही लक्ष करण्यात येत अाहे.