कठुवा घटनेच्या निषेधार्थ चांदूर रेल्वेत कॉंग्रेसचा कँडल मार्च – भाजपा सरकारचा ही नोंदविला निषेध

0
1362
(फोटो – शहेजाद खान) 
चांदूर रेल्वे –
    जम्मू काश्मिर मधील कठुवा येथे एका ८ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा जाहीर निषेध करण्याकरीता व दलित, मुस्लिमांवर राजरोसपणे अन्याय, अत्याचार करून गुन्हेगारांना पाठीशी घालून जाती जातीत वाद निर्माण करणाऱ्या भाजपा सरकारचाही निषेध करण्याकरीता चांदूर रेल्वे येथील तालुका कांग्रेस कमेटी, शहर काँग्रेस कमेटी, महिला काँग्रेस कमेटी, युवक काँग्रेस कमेटी तर्फे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक जुना मोटार स्टँड येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी मेनबत्त्या पेटवून श्रध्दांजली वाहीली.
        जम्मू काश्मिर येथे एका ८ वर्षांच्या निरपराध असिफा नावाच्या मुलीवर अमानवी अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ चांदूर रेल्वे शहरात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जुना मोटार स्टँड येथे कँडल मार्च चे आयोजन कॉंग्रेसतर्फे करण्यात आले. या कँडल मार्चमध्ये पक्षीय कार्यकर्त्यांसह असंख्य महिलांसह नागरिक  सहभागी झाले होते. यादरम्यान भाजप सरकारचा ही निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष नितीन गोंडाने, नगराध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सुर्यवंशी, अशोकभैय्या जयस्वाल, माजी जि. प. अध्यक्ष प्रविण घुईखेडकर, शहर अध्यक्ष प्रदिप वाघ, तालुकाध्यक्ष जगदिश आरेकर, बाजार समिती सभापती प्रभाकरराव वाघ, उपसभापती अशोक चौधरी,  बंडु मुंधडा, अनिसभाई सौदागर, चेतन भोले, नगरसेवक महेश कलावटे, प्रफुल्ल कोकाटे, युवक कॉंग्रेसचे रूपेश पुडके, हेमचंद बागमार, शहेजाद सौदागर, प्रवण भेंडे, सुमेध सरदार, महिला आघाडीच्या वैशाली ठाकरे, वर्षाताई देशमुख, अर्चना लाडे, सविता देशमुख, कुंदन राठोड, बंडु आठवले, प्रशांत कोल्हे, अब्दुल्ला कुरैशी, वाजीद खान, मोहम्मद दानिश, गोविंदराव देशमुख, मुमताज मुल्ला, मोसिन खान, भिमा पवार, शेख राजीक, संजय बाबर यांसह अनेकांची उपस्थिती होती.