अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ आहे ! – श्री. प्रकाश मालोंडकर, हिंदु जनजागृती समिती

0
554
Google search engine
Google search engine

ओडिशामधील बेमता येथे बैठकीचे आयोजन

 

राऊरकेला (ओडिशा) – अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ आहे. धर्माचरणाअभावी आपली ईश्‍वरावरील श्रद्धा अल्प पडते. त्यामुळे आपल्यात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लागणारे धैर्य नाही. हिंदू जात-पात, संप्रदाय, पक्ष, पद आदींमध्ये विभाजित झाल्याने संघटित नाहीत. त्यामुळे आपण बलहीन झालो आहोत; म्हणूनच धर्मांतर, लव्ह जिहाद, आतंकवाद, पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, देवतांची विटंबना, संतांचा अवमान, अशा अनेक आघातांनी जर्जर झालो आहोत. यातून बाहेर येण्यासाठी आपल्याला धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्याची आवश्यकता आहेे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सुंदरगढ जिल्ह्यातील बेमता येथे आयेजित केलेल्या बैठकीत केले. या वेळी त्यांनी नमस्कार कसा करावा ?, कपाळावर तिलक का लावावा ?, नामजप, प्रार्थना इत्यादी धार्मिक कृतींमागील शास्त्रीय महत्त्व आदी माहिती विशद केली.