मार्बल वस्तुची चमकदार किमयागारी

0
1678

सांगली/कडेगांव- हेमंत व्यास :-

मानवी जीवन दिवसेंदिवस अनिश्चित व संघर्षमय बनत आहे.माणसाचा माणसावरील माणुसकीचा विकासही विश्वासही डळमळीत होवु लागला आहे.

असुरक्षा व अनिश्चितेच्या या काळात मनाला दिलासा मिळेल असे वातावरण नाही अशा संभ्रमीत काळात कला माणसाला आत्मिक धैर्य व दिलासा देते,मार्बलच्या वस्तु मनाची उंची वाढवतात व रसिक मनाला उदात्त पातळीवर नेऊन ठेवतात.मार्बल पासुन मंदिर, विविध देवतांच्या मुर्ती, टिपॉय, टेबल, अगरबत्ती, तुळशीवृंदावन, देव्हारे अशा दैनंदिन व्यवहारातल्या वस्तु बनविणारा एक किमयागार सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील परिसरात विलक्षण लोकप्रियता प्राप्त करित आहे.संतोष भगवान चव्हाण व आप्पासो भगवान चव्हाण या दोन सख्ख्या भावांनी अल्पकाळातच एखाद्या नटा एवढी लोकप्रियता मिळवली आहे.हे कसे घडले ? का घडले? हे त्यांच्याच शब्दातील कथन विस्मयकारक व प्रेरक आहे.संतोष व आप्पासो चव्हाण या दोन सख्ख्या भावांची कुळकथा असामान्य नाही परंतु एक मनस्वी कलाकार प्रयत्न कल्पकता व परिश्रमाच्या जोरावर यशस्वी होवु शकतो हे दोघांनीही सिध्द केले आहे.शांत स्वभाव गोड भाषा ,विनयशिलता व आत्मविश्वास या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत.निरीक्षण,परिक्षण व समिक्षण या तिन्हीमुळे या कलेत दोघेही वाकबगार बनली आहेत.या दोन्ही भावांचे मुळ गाव सुपने ता.कराड जि.सातारा हे असले तरी त्यांचा पिंड घडला तो सांगली जिल्ह्यातील कडेगावातच कारण ती दोघे गेली दोन तपापासुन येथेच रहात आहेत.१९९३ साली कडेगांवच्या महात्मा गांधी विद्यालयातुन दहावी उत्तीर्ण झाले.वडील भगवानराव चव्हाण हे मुंबईला हिंदुस्थान मिलमध्ये कामाला होते.परंतु त्या मिलचा संप सुरू झाल्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम केला.अंत:प्रेरणेने त्यांनी एक मार्बल मंदिर बनविले ते सर्वांना खुप आवडले संतोष व आप्पासो यांचे काका तानीजीराव चव्हाण व वडील भगवानराव चव्हाण यांनी मुंबई सात रस्ता येथे लहानशा झोपडीत हा व्यवसाय सुरू केला .

राजस्थान,गुजरात,जयपुर येथुन मार्बल व अन्य सामुग्री मागविली जाते.वडील व काका यांचे मार्गदर्शनाखाली संतोष व आप्पासो अल्पकाळातच या व्यवसायात एकदम तरबेज झाले.दोघेही भाऊ स्वत: मार्बलची मंदिरे, विविध देवतांच्या मुर्त्या टेबल,टिपॉय,अगरबत्ती स्टँड इत्यादी वस्तु बनवतात.व त्याची विक्री करतात व लोकांची वाहवा मिळवतात.

या बाबत त्यांनी आवार्जुन सांगीतले की तरूण वर्ग सध्या मार्बल व्यवसायात करिअर करू इच्छीतात.वस्तुंच्या किंमती बद्दल बोलताना सांगीतले की वस्तुची किंमत ही त्याच्या साईजवर व डिझाईनवर अवलंबुन आहे.एका टेबलाची किंमत ५०००ते ७००० रूपये आहे तर टिपॉयची किंमत ३००० ते ४००० पर्यंत आहे.ग्रामीण व शहरी भागात या वस्तुंना भरपुर प्रमाणात मागणी वाढत आहे.
सध्या संतोष व आप्पासो यांचे काका तानाजीराव चव्हाण हे त्यांना व्यवसायात मदत करतात.पदवीच्या मागे न लागता व पुढाऱ्यांची हांजी हांजी न करता ही दोघेही स्वावलंबी बनली आहेत. स्वाभीमान, स्वावलंबन हे त्यांनी कृतीतुन दाखविले आहे.या व्यवसायापासुन त्यांना खुप मोठ्या अपेक्षा आहेत.व नवनिर्माणाची जीद्द मनी आहे.आपण या तरूण जीवनदायी कलाकारांना जरूर प्रोत्साहन देवुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देवुया.
मुर्तीकार,शिल्पकार आणि कलाकारांनी हे जीवन समृध्द व संपन्न केलेलेआहे.त्यांची कला नसतीतर त्यांच्या जीवनाला स्मशानाचे स्वरूप प्राप्त झाले असते म्हणुन संतोष व आप्पासो चव्हाण सारख्या कलाकार बंधुंना मोठ्या मनाने दाद दिली पाहीजे हो ना!!