आज चांदूर रेल्वेत सर्व पक्षीय, संघटनांतर्फे कँडल मार्च – शेर-ए-हिंद टिपु सुलतान मल्टीपरपज सोसायटीच्या सदस्यांचा पुढाकार

0
660
मुकल्यांवरील अमानविय अत्याचारांचा नोंदविणार निषेध
चांदूर रेल्वे – (Shahejad Khan) 
     देशात कठूआ, उन्नाव, सुरत येथे चिमुकल्या बालीकेंवर झालेल्या अमानविय अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या निषेधार्थ चांदूर रेल्वे शहरात शेर-ए-हिंद टिपु सुलतान मल्टीपरपज सोसायटीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन सर्व धर्मिय, सर्व पक्षीय, संघटनांतर्फे आज शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शांततेत कॅडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्च ची सुरूवात नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेपासुन चंद्रशेखर आझाद पुतळामार्गे जुना मोटार स्टँड पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
     हा मुकमोर्चा असल्याने कोणतीही घोषणा अगर जयघोष करण्यात येणार नसुन या मोर्चाच्या अग्रभागी पोस्टर, लहान मुले,मुली, त्या नंतर महिला आणि विशिष्ट अंतर ठेऊन बाकिची मंडळी सहभागी असतील. तसेच या मार्चमध्ये कुठलेही हार,तुरे राहाणार नाहीत. मार्च ची सांगता अत्याचार पिडित बालिकांसाठी मेनबत्ती लाऊन, मौन पाळून श्रद्धांजली वाहून करण्यात येईल. या मार्चमध्ये कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, आम आदमी पार्टी, शिवसेना पक्ष, बहुजन समाज पार्टी, ए.आय.एम.आय.एम. पक्ष (अमरावती), भारीप, कम्युनिष्ट पक्ष, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, भिम सेना, माणुसकी बहुउद्देशीय संस्था, श्रीराम सेना, डी.सी.सी. स्पोर्टींग क्लब, डी. एक्स. ग्रुप, सुयश बहुउद्देशीय संस्था, नवजिवन मागासवर्गिय विकास केंद्र, साहस बहुउद्देशीय संस्था, जय हिंद क्रिडा मंडळ, अजिंक्य क्रिडा मंडळ, आम्ही सारे फाउंडेशन, टिपु सुलतान गृप, मराठा संघटना, सर सैय्यद अहमद खॉं वेलफेअर सोसायटी, चांदूर रेल्वे या पक्ष, संघटनांचा सहभाग असणार आहे.
       चांदूर रेल्वे शहरातील शांतता प्रेमी सर्वच नागरीकांनी वेळोवेळी शहरातील बंधूभाव कायम ठेवण्यास सहकार्य केले आहे. शुक्रवारी २० एप्रिल रोजी देशात लहान बालिकांवरील वाढत चाललेल्या या अत्याचारा विरोधातील मार्चमध्ये शांततामय मार्गाने निषेध नोंदवण्यासाठी सर्व समाज,धर्माच्या, सर्व स्तरातील शांतता आणि बंधूभाव राखणाऱ्या प्रत्येक नागरीकाने हजारोंच्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शेर-ए-हिंद टिपु सुलतान मल्टीपरपज सोसायटी व शामील पक्ष, संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.