प्रभूआप्पा तोंडारे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ जाहीर

0
1016
Google search engine
Google search engine

प्रभूआप्पा तोंडारे यांना आजवर अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत

बीड :नितीन ढाकणे
सामाजीक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी कपिलधारेश्वर पतीष्ठाण लातूर यांच्या तर्फे समाजभूषण पुरस्कार देऊन गौर विण्यात येते  यावर्षीच्या समाजभूषण पुरस्कारसाठी नागापूर येथील माजी सरपंच, जुन्या पिढीतील नामवंत ज्येष्ठ नागरिक तथा तळमळीचे सामाजीक कार्यकर्ते प्रभुआप्पा तोंडारे यांची निवड झाली आहे.
प्रभूआप्पा तोंडारे यांना आजवर अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत समाजातील विविध जातीधर्मातील व्यक्तींसाठी ते अविरत कार्य करत असतात. गावामध्ये विविध सामाजीक संस्था बँक त्यांच्या पुढाकाराने नावारूपास आल्या आहेत. अशा एक नाही तर अनेक सामाजिक कामात ते अग्रेसर असतात. नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष पार केलेले प्रभूआप्पा आजच्या तरुणाईला लाजवेल असे प्रासंगीक अडीअडचणीला धाऊन जातात. त्यांनी नागापूर ते कपलीधार पदयात्रा विरशैव यात्रा सुरू केली या त्यांच्या कार्याची दखल घेऊन कपिलधारेश्वर प्रतिष्ठान लातूर यांनी या वर्षीचा मानाचा पुरस्कार समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे.
सदर पुरस्कार दि. २२ एप्रिल २०१८ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक गांधी मार्केट येथे माजी आमदार मनोहर पटवारी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
प्रभूआप्पा तोंडारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.