बलात्कार प्रकरणी आरोपी याला कठोर शिक्षा

0
823
Google search engine
Google search engine

👉🏻तीन वर्षाच्या त्या पीडितेला अखेर मिळाला न्याय

👉🏻न्यायालय आणि पोलिसांचे आभार

मोर्शी:-मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मगळूर भिलापूर परिसरात एक 3 वर्षीय मुलीवर कुरकुरे चे आमिष दाखवून अनैसर्गिक कृत्य 2017 मध्ये झाले होते.या प्रसंगी पीडितीच्या पालक यांच्या तक्रार वरून आरोपी यास अटक करण्यात आली होती.

*या घटने मध्ये शिरखेड पोलिसांनी भादवी*
*376 आनी पास्को अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.*

या प्रकरणात न्यायालयात सादर केले तेव्हापासून 12 साक्षीदार यांचा पुरावा घेण्यात आला.त्यांच्या आधारे आरोपी याला भादवी376 प्रमाणे 10 हजार रुपयांचा दंड ,10 वर्ष सक्त मजुरी बाल लैगिक अत्याचार अधिनियम 3 ,4 प्रमाणे 5000 दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणाचा तपास अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार,अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक अमरावती ग्रामीण मकानदार,उपविभागीय पोलीस अधिकारी मोर्शी दिलदार तडवी,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सदांनन मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन चव्हाण आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे यांनी केला होता.