*भर उन्हात न्यायासाठी मुक मोर्चाद्वारे नारीशक्तीचा आकोटात एल्गार*

0
834
Google search engine
Google search engine

अकोट/ संतोष विणके :-

जम्मु तथा कठुआ मधील पिडीतांना न्याय मिळावा,दोषींना कठोर शिक्षा व्हावी यामागणी साठी काल अकोट शहरात अभुतपुर्व मुक मोर्चा काढण्यात आला.या मुक मोर्च्यात सर्व नारीशक्ती,राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते व सर्व जाती,धर्माचे नागरिक एकञ आले होते.

हा मुक मोर्चा नियोजित मार्गाने शांततेत व शिस्तबद्ध स्वरूपात दुर्गामाता मैदान ते उपविभागीय कार्यालयात जाऊन मोर्चेकर्यानी अकोट उपविभागीय अधिकारी श्री.राजपुत साहेब यांना निवेदन दिले.सर्व मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पार पाडावा यासाठी अकोट शहर पोलीस प्रशासानाचा चोख बंदोबस्त होता.यासाठी अकोट शहर ठाणेदार गजानन शेळके हे परीस्थीतीवर लक्ष ठेवुन होते.या मोर्च्यात अकोट मधील सर्व राजकीय पक्षाचे नेते ,शालेय विद्यार्थी,महीला,पुरुष व विविध संस्था संघटनांचा सहभाग होता.विशेष म्हणजे या निषेध मोर्च्यात सहभागी बहुतांश महीला ,मुलींनी काळे कपडे परीधान केले होते.उन्हाचा तडाखा असतांनाही मोर्च्यात मोठ्या संखेने महीला मुली युवती सहभागी झाल्या होत्या.