*भाषेच्या प्रभावी वापरातुन समाज घडवता येतो  >< राजन खान अक्षर मानवच्या लेखन कार्यशाळेचा समारोप*

0
831

अमरावतीः संतोष विणके :-

भाषा ही कायम प्रवाही व प्रभावी असते.भाषेच्या प्रभावी वापरातुन समाज घडवता येतो.म्हणुन सतत लिहु ईच्छीणारांनी लेखनासाठी भाषेचा अभ्यास करत रहावा.असे विचार लेखक राजन खान (पुणे)यांनी अमरावती शहरात आयोजीत लेखन कार्यशाळेत व्यक्त केले.लेखन कार्यशाळेच्या समारोपीय सञात एकुण मराठी साहीत्याविषयी बोलतांना त्यांनी आपले मत मांडले.ही कार्यशाळा अक्षर मानव अमरावती व प्रयास यांच्या वतीने सेवांकुर भवन फरशी स्टॉप ,विमल नगर येथे आयोजीत करण्यात आली होती.

चार सञांमध्ये पार पडलेल्या या कार्यशाळेस संपुर्ण विदर्भासह ठाणे नाशीक,अहमदनगर ,परभणी सोबत स्थानीक लेखकांचा मोठा प्रतीसाद मिळाला.आपल्या उद्बोधनात राजन खान पुढे बोलतांना म्हणाले.वाचकांनी ऐतीहासीक कादंबऱ्यातील भंपंक पणा सहजपणे स्वीकारण्यापेक्षा त्याविषयीची दुसरी बाजुही वाचकाने वाचली पाहीजे,अश्याने ऐतीहासीक कादंबऱ्या वरील होणारा गोंधळ थांबु शकतो.शिवाय यामुळं लेखकांना सप्रमाण लिहण्याची जबाबदारी वाढेल.तत्पुर्वी दि.२१ ला सकाळी वसंत आबाजी डहाके यांची कवीता लेखन या विषयीचे सञ पार पडले.तर दुसऱ्या सञात कथा लेखक रविंद्र शोभणे यांनी कथा विश्व उलगडुन सांगत कथा लेखनाचे तंञ,मंञासह कथेतील भावभावना उलगडुन दाखवल्या.तसंच कथा लेखकांनी भरपुर कथा वाचन करुन आपलं भावविश्व व्यापक करण्याचा सल्ला दिला.तर दि.२२ ला दुसऱ्या दिवशी सकाळच्या सञात कादंबरी लेखक रमेश इंगळे उञादकर यांनी कादंबरी लेखनाची निर्मिती,तीचा आयाम,पाञांची निवड,आदींबाबत मार्गदर्शन केले.यात त्यांनी कादंबरी चे चिञपट क्षेञात होणारे माध्यमांतर या विषय ही आपले मत मांडले .

कार्यशाळेचा समारोपीय सञ हे राजन खान यांनी एकुण साहीत्य या विषयावर गुंफले.यात त्यांनी कथा,कवीता,कादंबरी,नाट्य लेखन,आदींबाबत माहीती दिली.समारोप कार्यक्रमाला प्रयासचे डॉ अविनाश सावजी उपस्थीत होते.या उपक्रमाचं कौतुक करत भविष्यात अक्षर मानव सोबत विविध कार्य करता येईल असा विश्वास व्यक्त केला.कार्यशाळेच्या विविध सञांचं सुञ संचालन प्रशांत देशमुख विदर्भ अध्यक्ष यांनी तर आभार प्रदर्शन रोषन यादगीरे यांनी केले.त्यांना अक्षर मानव अमरावतीच्या सर्व सदस्य पदाधीकारींचं सहकार्य लाभलं..