देशमुख समाज मेळावा संपन्न..।

0
881
Google search engine
Google search engine

शेगांव:- शेगांव शहरामध्ये देशमुख समाज मंडळाची स्थापना झाली या निमित्ताने दिनांक 22 एप्रिल 2018 रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्तिथी म्हणून प्रकाशराव देशमुख,रमेशराव देशमुख,यशवंतराव देशमुख,अशोकराव देशमुख, किरणबाप्पू देशमुख, कैलाश देशमुख,अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
नंतर देशमुख समाजाची कार्यकारणी सुद्धा जाहीर करण्यात आली यावेळी देशमुख समाज अध्यक्षपदी कैलास गुणवंतराव देशमुख, उपाध्यक्षपदी युवराज रावसाहेब देशमुख व गोपाल भास्करराव देशमुख, सचिव विठ्ठल श्रीधरराव देशमुख, सहसचिव अजय रामदास मोरखडे, कोषाध्यक्ष रवींद्र पंजाबराव देशमुख,सहकोषाध्यक्ष श्याम कराळे, प्रसिद्धी प्रमुख समीर रविंद्र देशमुख, विधिसल्लागार ऑड.चेतन सुरेशराव देशमुख, युवाध्यक्ष लखन लक्ष्मराव देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यानंतर उपस्तीत मान्यवरांनि महापुरुषांच्या जीवनावर व त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी किरण देशमुख यांनी समाज बांधवांना समबोधले समाज म्हणजे काय, समाजासाठी आपले कर्तव्य काय, नवीन युवा पिढीने आपली संस्कृती कशी जोपासली पाहिजे व सोबत आपण आपले कार्य प्रामाणिकपणे करावे ही अपेक्षा ठेऊन सर्वाना शुभेच्छा दिल्यात यानंतर प्रकाशराव देशमुख यांनी आपल्या आशीर्वादरुपी शब्दातून सर्वांना शुभेच्छा दिल्या व युवा मंडळींनी आपले कार्य असेच सुरु ठेवावे आम्ही आपल्या सोबत आहोत.नंतर नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आलेल्या सर्व समाज बांधवांचे आभार मानले व युवकांना कार्य करण्यास आव्हान केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सागर देशमुख व आभार निकुंज देशमुख यांनी केले.