वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या मतदार संघातील 12 गावांमध्ये ना.धनंजय मुंडे करणार श्रमदान

0
937
Google search engine
Google search engine

नाथ प्रतिष्ठान तर्फे स्पर्धेतील गावांना डिझेल आणि साहित्य देणार

बीड, परळी वैजनाथ : नितीन एस ढाकणे

दि.23: पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या परळी मतदार संघातील गावांमध्ये श्रमदानामध्ये स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे सहभागी होणार आहे. एवढेच नव्हे तर या कामांसाठी लागणारा डिझलचा खर्च आणि श्रमदानासाठी लागणारे टोपली, खोरे, कुदळ हे साहित्य ही नाथ प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणार आहे.

परळी तालुक्यातील बोधेगांव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या जल शुध्दीकरण प्रकल्पाचे उदघाटन आचार संहितेमुळे रद्द झाल्यानंतरही गावकर्‍यांनी ना.धनंजय मुंडे यांचा पॉवरफुल राजकारणी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भव्य सत्कार केला. त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी आमदार रामराव वडकुते हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे यांना मल्हाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

परळी मतदार संघातील बारा गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भाग घेतला असुन या गावकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक 26 एप्रिल ते 28 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत दररोज सकाळी ना.मुंडे हे दोन गावांमध्ये जावुन स्वतः श्रमदान करणार आहेत. एवढेच नव्हे तर या कामासाठी लागणारा डिझेल खर्च व साहित्य देण्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली. गावात 2 हजार लिटर चा वॉटर फिल्टर प्लॅट बसवुन शुध्द पाणी पुरवठा केल्याबद्दल त्यांनी माऊली गडदे यांचे व गावकर्‍यांचे अभिनंदन केले तसेच स्वतःच्या मुलासाठी किडणी देणार्‍या सत्यभामाबाई पांचाळ यांचा सत्कारही केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष अजय मुंडे, पंचायत समिती सभापती मोहन सोळंके, मार्केट कमिटी सभापती सुर्यभान नाना मुंडे, जि.प.सदस्य बबन दादा फड, पं.स.उपसभापती पिंटु मुंडे, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, बाबासाहेब काळे, विष्णुपंत देशमुख, भानुदास डिघोळे, अरूण मुंडे, सतिश गडदे, मारोती कौचाळे, प्रकाश कावळे, सतीश सलगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

—————————————-

ना.धनंजय मुंडे यांचा श्रमदान दौरा

दरम्यान ना.धनंजय मुंडे हे गुरूवार दि.26 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान दररोज सकाळी वॉटरकप स्पर्धेतील गावांमध्ये श्रमदान करणार असुन त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.

गुरूवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता रेवली, सकाळी 9.30 वाजता परचुंडी, सायंकाळी 7.00 वाजता बोधेगांव दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता वानटाकळी, सकाळी 9.30 वाजता नागपिंप्री तर दिनांक 28 एप्रिल रोजी अंबाजोगाई तालुक्यातील सकाळी 7.30 वाजता उजणी, सकाळी 9.30 वाजता सोमनवाडी तर सायंकाळी 7.30 वाजता पुस.

—————————————–