*श्री नवयुग वाचनालय आयोजीत खानापुरकर स्मृती व्याख्यान मालेत “शौर्यगाथा”*

80

आकोटः संतोष विणके :-

श्री नवयुग वाचनालय द्वारा आयोजीत कै माधव ञ्यंबक खानापुरकर स्मृती व्याख्यान मालेत वासुदेव बळवंत फडके एक शौर्यगाथा या विषयावर सातारा येथील प्रसाद चाफेकर यांचे व्याख्यान सोमवारी नवयुग वाचनालयात पार पडले.या व्याख्यानात चाफेकर यांनी क्रांतीकारी वासुदेव फडके यांच्या प्रखर राष्ट्र भक्ती व संघर्ष तथा शौर्यगाथा कथन केली.क्रांतीकारी विचारांची ही शौर्यगाथा ऐकण्यासाठी शहर वासीयांनी भरगच्च उपस्थीती लावली होती.यावेळी मंचावर जेष्ठ विधीज्ञ बाळासाहेब आसरकर,नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे ,तसेच नवयुग वाचनालयाचे अध्यक्ष मोहन आसरकर यांची उपस्थीती होती.तर उद्या याच व्याख्यान मालेत प्र के अञे यांच्या विनोदी व भावनाप्रधान नाटकांची मजेदार गोष्ट या विषयावर पुष्प गुंफल्या जाणार आहे.