*भरगच्च उपस्थीतीने शेतकरी संघटनेची राज्यव्यापी युवा परिषद संपन्न*

0
784
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके –

शेतीसमोरील,युवकांसमोरील व देशाच्या एकंदर आर्थीक स्थिती समोरील आव्हानांवर चिंतन करण्यासाठी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी युवा परिषद रवीवारीअकोट येथे विविध भागातीलव विविध क्षेत्रातील युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.
स्वातंत्र्यानंतर शेतीतील अशा परिस्थितीत युवकांना वास्तवाचे अर्थभान शिकवणाऱ्या शेतकरी संघटनेच्या युवा परिषद ला अनन्य साधारण महत्व प्राप्त होतेय या युवा परिषदेला शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल घनवट,माजी अध्यक्ष वामनराव चटप,गुणवंतराव पाटील,सरोजताई काशीकर,महिला आघाडी माजी अध्यक्षा शैलजताई देशपांडे,स्वतंत्र भारत चे अध्यक्ष ऍड दिनेश शर्मा, शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललित बहाळे, प.महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे,युवा आघाडी राज्य प्रमुख सतीश दाणी,युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ निलेश पाटील,प.विदर्भ शेतकरी संघटना प्रमुख धनंजय मिश्रा,सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड,प.महाराष्ट्र युवा आघाडी प्रमुख अभिमन्यू शेलार,जेष्ठ मार्गदर्शक नंदू खेर्डे, विजय भाऊ लोडम,संग्राम अनपट यांचे सह विविध जिल्ह्यातून शेतकरी संघटनेचे सर्व जेष्ठ पदाधिकारी,कार्यकर्ते व अकोला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवकांची सदर युवा परिषदेला भरगच्च उपस्थिती होती.

परिषदेचे प्रास्ताविक युवा आघाडी चे राज्य अध्यक्ष सतीश दाणी केले बीजभूमीका प्रवक्ता व मुख्य आयोजक ललीत बहाळे यांनी मांडली.
पहिल्या सत्रात माजी अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी सरकारी धोरणांमुळे शेती व्यवसायात आलेली अल्प भूधारकता ही खरी समस्या असून त्याचे दुष्परिणाम सविस्तर विषद केले.सिलिंग च्या कायद्यासह शेतीबाहेरील लोकांनी इच्छा असल्यास शेतीत येणे व शेती सोडून दुसऱ्या व्यवसायात जाऊ इच्छिणाऱ्यांना मोकळीक असल्याशिवाय शेती व अन्य क्षेत्रांतही भांडवल व रोजगार निर्मिती होऊ शकत नाही हे विस्तृत पणे विषद केले.शेतीतील अल्पभूधारकता व लुटीची धोरणे युवकांना भिकवादी आदिलनांकडे ढकलत असून त्यातून देशामध्ये अराजकता माजण्याचा प्रसंग ओढवू नये एवढा उद्वेग युवकांच्या मनात आहे.
याच सत्रात स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष ऍड.दिनेश शर्मा यांनी रोजगाराच्या सृजनासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल गरजेचा असून देशामध्ये श्रम प्रतिष्ठा व धोका पत्करण्याची तयारी असलेल्या युवकांचे निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था व धोका पत्करणाऱ्यांनाचा सन्मान करणारी एकंदर व्यवस्था असल्याशिवाय देश उभा राहू शकत नाही असे प्रतिपादन केले.
पुढील सत्रामध्ये नंदू खेर्डे यांनी समाजवादी सापळ्यात अडकत चाललेला युवक या विषयावर देशातील प्रचलीत समाजवादी धोरणांमुळे श्रम,बुद्धी,गुंतवणूकीला व धोका पत्करण्याच्या क्षमतेला प्रतिष्ठा न लाभल्यामुळे उत्पादक श्रमांकडे वळण्यास फारसे कुणी तयार होतांना दिसत नाही व त्यामुळे देश कसा उभा राहू शकणार? हा मोठा प्रश्न उभा ठाकला असल्याचे व हमारी मांगे पुरी करो टाइप आंदोलनांच्या समाजवादी सापळ्यात युवक अडकत चालला असून ही मोठी चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन केले.
याच सत्रात युवकांसाठी रोजगार समस्या व संधी या विषयावर बोलतांना शेतकरी संघटना युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ निलेश पाटील यांनी शेतीवरील बंधने व शेतीतील लुटीची धोरणे या मुळे मोठ्या संख्येने येऊ घातलेल्या युवा जनसंख्ये समोर रोजगाराची समस्या उत्पन्न करून ठेवली असून हे सर्व युवा आता सरकारी नोकऱ्यांची अपेक्षा बाळगून त्या दृष्टीने आपल्या आयुष्याचा मोठा वेळ व पैसा खर्च करीत आहेत.दुसरीकडे अर्थव्यवस्थेवरील वेतनांचा भार पाहता या पुढे सरकारी नोकरी मिळणे युवकांसाठी अशक्य गोष्ट असेल तर एकीकडे शेतीला भविष्य नाही,दुसरीकडे लायसन्स,कोटा,परमीट,इन्स्पेक्टर राज आदींमुळे उद्योगा कडे युवक वळावेत,धोका पत्करण्याचे धाडस त्यांच्या मध्ये निर्माण व्हावे असे वातावरण नाही,अशा स्थितीत शेतीवरील भार कमी करण्यासाठी शेतीला बंधमुक्त करण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले.
पुढील सत्रांत महिलांच्या स्थितीबाबत चिंतन करण्यात आले या सत्रात माजी अध्यक्षा सरोजताई काशीकर यांनी शरद जोशींनी एकमेव आरक्षणाला साथ दिली ते म्हणजे महिला आरक्षण.आरक्षण तर मिळवून दिले पण त्यातून येणाऱ्या संधींचा लाभ व्हावा असे राजकीय वातावरण निर्माण होऊ दिले गेले नाही.लक्ष्मीमुक्ती च्या माध्यमातून लाखो महिलांना संपत्तीत वाटा मिळवून दिला.लिंग आधारीत श्रमविभागणी ला झुगारून स्त्रियांना मोकळीक व प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य शरद जोशींनी केले पण राजकीय व्यवस्थेत मात्र स्त्रियांची हेळसांड मात्र सुरूच आहे.मुक्ती च्या एकूण आंदोलनांचाच एक भाग शेतकरी संघटनेसाठी स्त्री मुक्ती असून संघटना त्यासाठी प्रयास करीत राहील असे प्रतिपादन केले.
याच सत्रात शैलजा ताई देशपांडे यांनी शेतीच्या लुटीचा इतिहास हजारो वर्षांचा असून हा इतिहास बदलण्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थीक स्वातंत्र्याच्या लढ्याशिवाय पर्याय नाही.शेतकऱ्यांच्या आर्थीक स्वातंत्र्यातच महिलांच्या स्वातंत्र्याची बीजे दडलेली असल्याचे विषद केले. याच सत्रात महिला आघाडीच्या सीमाताई नरोडे यांचे शेती व महिलांच्या प्रश्नांवर शेतकरी संघटनेची भूमिका मांडणारे झंझावाती भाषण झाले.
समारोपीय सत्रात ललीत बहाळे यांनी संपत्तीचे वितरण हे सरकारी तिजोरीतून न होता सर्जकांच्या खिशातून व्हावे म्हणजे देशात उत्पादीत होणारी संपत्ती युवकांना स्पर्शून जाईल व त्यातून युवकांच्या समस्या सुटतील हे सविस्तर विषद केले.माजी अध्यक्ष ऍड वामनराव चटप यांनी युवकांच्या बेरोजगारी ची राजकीय कारण मीमांसा विषद करत देशाच्या व राज्याच्या आर्थिक स्थितीचे विवरण मांडले.आर्थीक उन्नतीसाठी उत्पादकांच्या आर्थीक स्वातंत्र्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन करून युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर शेती व उद्योगाशिवाय पर्याय नसल्याचे विस्तृतपणे मांडले.
परिषदेचा समारोप करतांना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतीवरील भार कमी करण्याशिवाय पर्याय नाही हा शेतकरी संघटनेचा विचार रुजवण्याची गरज आहे,बंधमुक्त शेती व उद्योगाकडे युवाशक्ती चा ओघ वाढणे हेच पर्याय असल्याचे सांगीतले. युवकांनी राजकीय पुढाऱ्यांच्या मागे फीरल्यापेक्षा गावात पुढारी आल्यास त्याला स्वातंत्र्याचे काय? तंत्रज्ञान स्वातंत्र्य,बाजारपेठांचे स्वातंत्र्य,उद्योगांचे व कमाईचे स्वातंत्र्य केंव्हा मिळेल?असे प्रश्न विचारून झाडाझडती आंदोलन तीव्र करण्याच्या सुचना दिल्या.तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी मे महिन्यात यवतमाळ येथे मोठे आंदोलन उभारण्याची सूचना अध्यक्षांनी दिल्या.प्रास्ताविक धनंजय मिश्रा यांनी तर आभार विलास ताथोड यांनी मानले युवकांसाठीच्या विशेष सत्रात अविनाश नाकट,पञकार उमेश अलोने,साहित्यिक किशोर बळी, युवा वक्ता गायत्री देशमुख,ऍड नजीब शेख ,लक्ष्मीकांत कौठकार यांनी मतं मांडली. संजय कोल्हे,मदन कामडे यांनीही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याशिवाय अच्छे दिन ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकत नसल्याचे सांगीतले