बीडच्या प्रतीक्षा मुंडेला राज्य अंजिक्यपद कुस्तीमध्ये रौप्य पदक 

0
956

बीड,परळी वैजनाथ : नितीन ढाकणे

क्रिडा व युवक सेवा संचनालय व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद विभागीय क्रिडा संकुल कार्यकारी समिती शिंपोली मुंबई बोरीवली यांच्या वतीने आयोजित दि. १३ ते  १५ एप्रिल दरम्यान नुकतीच संपन्न झालेल्या चौथी स्वर्गीय खाशाबा जाधव चषक महिला कुस्तीमध्ये पै. प्रतीक्षा मुंडे हिने ५७ किलो वजन गटात नैञदीप कुस्त्या करुन बीड जिल्हासाठी तिने रौप्य पदक मिळविले पै. प्रतीक्षा मुंडे हि  मौजे कन्हेरवाडी ता. परळी वै. येथील सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत अनंतराव मुंडे यांची कन्या आहे

प्रतिक्षा मुंडेने  आज पर्यत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विद्यापीठांच्या अंतर्गत वेगवेगळ्या स्तरावरील अनेक पदके मिळवीली आहेत  तरी पै. प्रतीक्षा मुंडेला आळंदी येथील जोगा महाराज व्यायाम शाळेतील प्रा. दिनेश गुंड सर यांच्याच मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे . सध्या पुणे येथील भारती विद्यापीठ येथे शिक्षण घेत आहे .येणार काळात बीड जिल्हाचे नाव लौकिक करेल शाळा महाविद्यालयातील मुलींना प्ररणादायी ठरेल  .

पै.प्रतीक्षा मुंडेच्या यशाबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंडे  साहेब . संघटनेचे अध्यक्ष ना. गोविंदराव चव्हाण फुलचंद कराड ,अजय मुंडे बबन दादा फड ,राजाभाऊ फड ,मानिक फड, श्रीराम मुंडे परळी तालूका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे सुभाष नानेकर अतुल दुबे, पवन  मुंडे कुस्तीगीर प्रतीक्षा मुंडे हिचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या