बांगलादेशातील हिंदु कुटुंबाला धर्मांधांनी बळजोरीने घराबाहेर काढून केला घराचा लिलाव

0
855

बांगलादेशातील हिंदूंसाठी जगभरातील एकही मानवाधिकार संघटना, जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख, भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भारत सरकार साहाय्यासाठी पुढाकार घेत नाही, हे लक्षात घ्या !

ढाका – पैशाच्या देवाण-घेवाणीवरून येथील न्यायालयाने दिलेल्या एकतर्फी निकालाचा अपलाभ घेऊन एका धर्मांधाने अनुमाने १५० गुंडांच्या साहाय्याने १२ जणांच्या हिंदु कुटुंबाच्या घरावर आक्रमण करत त्यांना घरातून हुसकावून लावले. त्यानंतर त्यांच्या १ कोटी ५० लक्ष टका (बांगलादेशी चलन) मूल्याच्या मालमत्तेचा लिलाव केला. चांदपूर जिल्ह्यातील माझीगाचा गावात नुकत्याच घडलेल्या घटनेची माहिती येथील हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी पत्रकारांना दिली.

१. चांदपूर येथील सहजिल्हा न्यायाधीश यांनी एका हिंदु कुटुंबाविरुद्ध पैशाच्या देवाण-घेवाणीवरून चालू असलेल्या खटल्यात त्या हिंदु कुटुंबाच्या अनुपस्थितीचा अपलाभ घेऊन त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला.

२. या आदेशाची कसलीही पूर्वसूचना या हिंदु कुटुंबाला न देता पोलीस आणि न्यायाधीश यांच्या साहाय्याने एका धर्मांधाने भाडोत्री गुंडांना घेऊन कुटुंबाच्या घरावर आक्रमण केले आणि तेथील मालमत्तेची हानी करून त्यांना हुसकावून लावले.

३. या घटनेची माहिती मिळताच अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास केला. त्या वेळी त्यांना स्थानिक प्रशासनाने पीडित हिंदु कुटुंबाच्या अज्ञानाचा अपलाभ घेऊन त्यांना अवैधरित्या घरातून हाकलून लावल्याचे निदर्शनास आले. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी स्थानिक निवासी अधिकारी (युनो) यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पीडित कुटुंबाला काही काळापुरते साहाय्य करण्याचे मान्य केले.

४. अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पीडित कुटुंबाला त्वरित त्याच्या घराचा ताबा मिळावा आणि त्यांना हुसकावून लावणार्‍यांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली, तसेच या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, अशीही मागणी केली.