*प्र.के.अञेंच्या नाटकांच्या गोष्टींनी नवयुग वाचनालयातील व्याख्यान मालेचा समारोप*

0
1321
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-

श्री नवयुग वाचनालय द्वारा आयोजीत कै माधव ञ्यंबक खानापुरकर स्मृती व्याख्यान मालेत दुसरे व अंतीम पुष्प मराठीतील जेष्ठ साहीत्यीक प्र के अञे यांनी लिहलेल्या विविध विनोदी व भावनाप्रधान नाटकांच्या गोष्टींवर आधारीत व्याख्यानाने समाप्त झाली. सातारा येथील प्रसाद चाफेकर यांनी या व्याख्यानाचे अंतीम पुष्प सुंदररीत्या गुंफले.

व्याख्यानाला शहर वासीयांनी भरगच्च उपस्थीती लावली होती . प्र के अञे यांच्या विनोदी व भावनाप्रधान नाटकांची मजेदार गोष्ट यात चाफेकर यांनी अञेंच्या विविध विनोदी तथा भावना प्रधान नाटकांचा पट उलगडला.यावेळी त्यांनी अञेंच्या नाटकातील छांदिष्ट पाञांवरही प्रकाश टाकला.अञेंची साष्टांग नमस्कार या नाटकातील छंदीष्ट पाञ
घराबाहेर हे नाटक
भ्रमाचा भोपळा…
मोरुची मावशी विनोदी नाटक
लग्नाची बेडी, कवडी चुंबक नाटक.
पाणीग्रहण,प्रेम की पैसा श्रेष्ठ
बुवा तिथे बाया,
जग काय म्हणेल
तो मी नव्हेच,
उद्याचा संसार आदी नाटकातील पाञ व नाटकाविषयी त्यांनी रंजक माहीती दीली.दरम्यान वाचनालयाच्या वतीने चाफेकर यांना अध्यक्ष मोहन आसरकर यांच्या हस्ते भेट देण्यात आली.व्याख्यानमालेचे समारोपीय आभार प्रदर्शन दत्ताञय शास्ञी यांनी मानले.या व्याख्यानमालेच्या रुपाने अकोटच्या सांस्कृतिक विश्वाला परत नवी उभारी मिळाली .