वरुण गॅस एजन्सी च्या वतीने उज्वला दिवस मोठ्या उत्साहात साजरा

0
860
Google search engine
Google search engine

महागाव –

घरगुती इंधनासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती.परंतु प्रधानमंत्री उज्वला योजना हि महिलांसाठी नवसंजवणी ठरली आहे.ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना डोळ्यावर व शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी उज्वला योजना वरदान ठरली आहे.केंद्र शासनाच्या ग्राम स्वराज्य अभियाना अंतर्गत उज्वला दिवसानिमित्य समाजातील अंतिम टोकाच्या गृहिणीला चुलीच्या धुरापासून सुटका होऊन तिचे आरोग्य अबाधित राहिले पाहिजे यासाठी पंतप्रधान उज्वला योजना देशभर कार्यरत असून या योजनेच्या वर्धापन दिवसावर २० एप्रिल रोजी वरुण गॅस एजन्सी महागाव च्या वतीने पंतप्रधान योजनेंतर्गत उज्ज्वला दिवसानिमित्त कलगाव येथे गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.

यावेळी गॅसचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.प्रत्येक घरात गॅस कनेक्शन देऊन महागाव तालुका धूर मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वरुण गॅस एजन्सीचे व्यवस्थापक वरुण भवरे यांनी सांगितले ज्यांचे उज्वला योजनेत नवे नाहीत त्या महिलांसाठी नव्याने आलेल्या योजनेची माहिती वरुण गॅस एजन्सीचे व्यवस्थापक वरुण भवरे यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंजाब सरदार यांनी केले. तर आभार प्रदर्शन वरुण गॅस एजन्सीचे मॅनेजर वाघमारे साहेब तर प्रास्ताविक पांडुरंग सावळे यांनी केले. यावेळी कलगाव येथील महिला सरपंच मीराबाई केदार यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला कलगाव येथील उपसरपंच,पोलीस पाटील,शिक्षक,गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.