शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा सौर प्रकल्प गव्हाणकुंडात -आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात उर्जा प्रकल्प उभारणीला सुरवात.

0
557
Google search engine
Google search engine

— — — — — — — — — — — —
संदीप बाजड -वरुड (अमरावती) :

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा सौर प्रकल्प गव्हाणकुंडात साकार होत असल्याने मोर्शी – वरुड मतदार संघाचे आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात उर्जा प्रकल्प उभारणीला सुरवात २६ एप्रिल २०१८ पासून करण्यात आली. मोर्शी तालुक्यातील ठाणाठुनी येथे संत्रा उन्नती प्रकल्पाच्या उभारणीला सुरवात झाली असून या पाठोपाठ लगेच वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील प्रकल्पाच्या उभारणीला सुरवात झाल्याने तालुक्यासह संपूर्ण मोर्शी मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदर्श ग्राम गव्हाणकुंड येथील २५ मेगावॉट सोलर उर्जा प्रकल्पाच्या उभारणीबाबत आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच महाजेनकोच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. याबैठकीत सदर प्रकल्प उभारणी संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली, उर्जा प्रकल्प कामाबाबतच्या निविदेला शासनाने मान्यता दिली असून सौर उर्जा प्रकल्पाच्या उभारणीला आ.डॉ.अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीमध्ये सुरवात झाली आहे. सौर उर्जा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याचा विश्वास हि यावेळी महाजेनकोच्या अधिकाऱ्यांनी आमदार महोदयांना दिला आहे.

सौर उर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी शासनाकडून महाजेनको विभागाचे अधिकारी नातू साहेब, हजारे साहेब, मेश्राम साहेब, निमजे साहेब, गव्हाणकुंडचे सरपंच ब्राम्हणे, कंत्राटदार लोणारेजी, मस्केजी, बाळूभाऊ मुरुमकर, इंद्रभूषण सोंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा गव्हाणकुंड येथील २५ मेगावॉटचा सोलर उर्जा प्रकल्प हा विदर्भात पहिल्यांदा साकार होत असल्याने सर्वांचे विशेष लक्ष या प्रकल्पाकडे लागले आहे