केंद्रीय गृह व रसायन राज्यमंत्री यांच्या मार्फत केंद्र सरकारला कळवल्या शेतकऱ्यांच्या भावना – भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य का नाही?

0
1238
Google search engine
Google search engine

अकोला :-

श्रम,बुद्धी,गुंतवणुकीच्या बळावर धोका पत्करून संपत्तीचे सृजन करणारा शेतकरी स्वतःच आपले उत्पन्न वाढवतो व देशाच्या संपत्तीतही भर घालत असतो फक्त सरकारने त्याच्या तंत्रज्ञान व बाजारपेठाच्या मार्गातील अडसर दूर करावे.
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आज केंद्रीय गृह व रसायन राज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांना शेतकऱ्यांच्या भावना कळवल्या.
शेती हा देशाचा मुख्य प्राथमीक व्यवसाय असून देशातील ६०% जनसंख्या कृषीवर अवलंबून असतांना जागतीक परिवेशामध्ये भारतीय शेतकरी अद्यावत तंत्रज्ञानाशिवाय स्पर्धेमध्ये कसा टिकेल हा मोठा प्रश्न सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे उदभवला आहे.नुकत्याच झालेल्या हंगामात गुलाबी बोन्ड अळी च्या प्रादुर्भावा ने ४५% एवढे उत्पादनाचे नुकसान झाले.कीटकनाशकांवर मोठा खर्च होऊन आर्थीक नुकसाना मुळे शेतकऱ्यांमध्ये आलेल्या उद्विग्नतेला जबाबदार कोण? या वर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी स्पर्धाक्षम होण्यास अडसर निर्माण झाला आहे.
BT ट्रायल्स वर बंदी आणतांना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आल्या नाहीत.जगातील अनेक प्रगत देशांत BT चे अद्यावत तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमालीचा घटला उत्पादकताही प्रचंड वाढली आहे.अशा परिस्थितीत जनसंख्येचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्या चे उफराटे धोरण सरकार का? सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा हास्यास्पद आहे अशा भावना शेतकरी संघटनेचे सोशल मेडिया प्रमुख विलास ताथोड,युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ.निलेश पाटील,शेतकरी संघटना प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट उपस्थित होते.आपल्या भावना सरकार दरबारी कळवू अशी समजूत घालून मंत्री महोदयांनी प्रस्थान केले