*अकोट शहर पोलिसांच्या तत्परतेने हरविलेला चिमुकला तासाभरातच स्वगृही…*

0
726
Google search engine
Google search engine

अकोट : संतोष विणके –

आकोट एसटी स्टँड वर भर दुपारी एक मुस्लिम महिला आपल्या 5लहान मुलांना घेऊन दर्यपूरला जाण्या साठी बस स्थानक येथे आली. बस पकडण्याच्या घाई मध्ये ती 3 वर्षाच्या मुलाला अकोट बस स्थानकावरच विसरून बस मध्ये बसली.सुदैवाने अकोट शहर पोलीसांच्या तत्परतेने हा हरवलेला चिमुकला १ तासातच तीच्या नातेवाईकांकडे सुखरुप पोहचला.बस मध्ये गर्दी असल्याने मुलगा अकोटातच राहल्याचे त्या महीलेच्या लक्षात आले नाही, पण दर्यापूर ला गेल्यावर खाली उतरल्यावर तिच्या लक्षात आले की एक मुलगा दिसत नाही त्या मुळे तिने दर्यापूर बस स्थानका वर शोधले परंतु मुलगा मिळून न आल्याने तिने दर्यापूर बस स्थानकावर ध्वनीक्षेपका मधून जाहीर सुद्धा केले परंतु मुलगा मिळून आला नाही, दरम्यान अकोट शहर चे गुन्हे शोध पथकाचे जितेंद्र कातखेडे, राहुल वाघ, नासिर शेख, मंगेश खेडकर, हे गस्त करीत असतांना त्यांना अकोट बस स्थानकाच्या बाहेर एक 3 वर्षाचा लहान मुलगा रडत असतांना दिसला , त्याची चौकशी केली असता तो काहीच सांगण्या च्या मानसिकते मध्ये नव्हता व वय लहान असल्या मुळे त्याचे कडून काहीच उपयुक्त माहिती न मिळाल्यामुळे पोलिस पथकाने त्याचे नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.शोध लागत नव्हता, तेवढ्यात दर्यापूर वरून मुलाच्या आई ने त्यांचे नातेवाईकाला शोध घेण्या साठी पाठविले , पोलिस पथक शोध घेतच होते, रडत असलेल्या मुलाची पथकाने समजूत घालून 1 तासाचे आत त्याचे नातेवाईक आंबोळी वेस येथे राहणारे शेख आसिफ शेख आरिफ ह्यांचे ताब्यात सुखरूप दिले व रडत असलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू फुलले, मुलगा सुखरूप मिळाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.सुट्यांचा तथा लग्नाचा मोसम असल्यामुळं एस टी बस ,रेल्वेंवर तुफान गर्दी होत आहे त्यामुळं प्रवास्यांनी आपली लहान मुलं ,पर्स ,दागीने आदी सांभाळुन ठेवणे गरजेचे आहे.हे या घटनेने दीसुन आले.