रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त परभणीत रस्ता सुरक्षा रॅली संपन्न

0
1363
Google search engine
Google search engine

परभणी :-

आरटीओ विभाग, शहर वाहतूक शाखा व महामार्ग पोलिस यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित रस्ता सुरक्षा रॅली परभणी येथे संपन्न झाली.
रॅलीस पोलिस अधिक्षक दिलीप झळके यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यावेळी आरटीओ विभागातील श्री.झाडबुके, श्री.माने, श्री.अल्लमवार, श्री.जाधव व पोलिस विभागाचे श्री.खान, श्री.पठाण, श्री मोरे, श्री.कुमावत आणि महामार्ग पोलिस विभागातील श्री.वाघमारे, श्री.रौनक, श्री.दराडे आदि सहभागी झाले होते. या रॅलीतून हेल्मेट वापरा, सीटबेल्ट वापरा, हॉर्न नको, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा आदि संदेश देण्यात आले. रॅलीमध्ये मोटारसायकल स्वार हेल्मेट घालून तर चारचाकी वाहनचालक सीटबेल्ट लावून तसेच ॲटोरिक्षा व इतर वाहने हॉर्न नको असे स्टिकर्स लावून अत्यंत शिस्तबध्दपणे चालत होते.

रॅलीस सर्व वाहन वितरक, ड्रायव्हिंग स्कुल संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी सहकार्य केले. रॅलीतील रस्ता सुरक्षा रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.