मध्यप्रदेशातुन रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन अकोट शहर पोलिसांच्या जाळ्यात

0
795
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके –

मध्यप्रदेश च्या बैतुल येथून कन्हान नदीची रेती आणून अकोट येथे रेती खाली करण्याच्या प्रयत्नात असलेला ट्रक अकोट शहर पोलिसांनी काल दि.30 ला पकडला. प्राप्त माहिती नुसार मध्यप्रदेश च्या बैतुल येथून कन्हान नदीची अतिशय महागडी रेती कायदेशीर परवान्यांचे भंग करून अकोट शहरात येत असल्याची गुप्त माहिती शहर पो स्टे चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना मिळाली .त्यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके, विलास मिसाळ ह्यांना खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले,पोलीसांनी खात्री केली असता सदर ची महागडी रेती ही मध्यप्रदेश च्या बैतुल जिल्ह्यातील खडसा गावावरून अंजनगाव पर्यंतचा परवाना बनवून अवैध रित्या अकोट येथे आणल्याचे कळले. दरम्यान महसूल विभागाला ह्याची माहिती देण्यात आली, त्यांनी खात्री केली असता चालक मालक दानिश मोहम्मद शफी रा,अचलपूर ह्याने ट्रक क्रमांक MH 27 X 8546 मध्ये कन्हान नदीतून महागडी रेती भरून परवाना अचलपूर येथ पर्यंत असतांना सुद्धा अवैध रीत्या अकोट येथे रेती आणल्या वरून सदरचा ट्रक पोलिस स्टेशनला लावण्यात आला आला तसे लेखी पत्र पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी तहसीलदार ह्यांना दिले असून सदर ट्रक मालकाला लाखो रुपये दंड होण्याचं शक्यता व्यक्त होत आहे.सद्या आकोट शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरु असुन रेतीचा धंदा चांगलाच फैलावला आहे.