*मित्रा मुळे वाचला जीव*

132

प्रतिनिधी/सचिन बडे :-

बीड : पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा येथील एका २२ वर्षीय तरुणावर वाघाने हल्ला केला असून जखमी तरुणावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेलखंडी पाटोदा येथील तीन तरुण बाहेर गावी जात असताना जवळच असलेल्या बांगर तलावावर हे तिघे पाणी पिण्यासाठी जात होते. तलावाच्या शेजारी असलेल्या झुडपात वाघ दबा धरून बसलेला होता. मोहन यशवंत शहाणे हा तरुण तलावाजवळ पाणी पीत असताना पाठीमागूनच वाघाने त्याच्यावर हल्ला केला. वाघाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी या तरुणाने आरडाओरड सूरु केली. तर अन्य दोन तरुणांनी वाघावर दगडाचा वर्षाव सुरू केला. वाघाच्या चार पायातून मोहनने काशी बशी सुटका करून घेत स्वतःचा जीव वाचवला. वाघाच्या हल्ल्यात मोहन जखमी झाला असून त्याच्या दंडावर वाघाने चावा घेतला आहे. वाघ पळून गेल्या नंतर या तरुणास बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.